ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केला शिवसेनेत प्रवेश ...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 19, 2019 03:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केला शिवसेनेत प्रवेश ...

शहर : मुंबई

काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवारी मातोश्रीवर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियंका चतुर्वेदी यांनी कॉंग्रेसचा हात सोडून शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले आहे. मी अत्यंत विचारपूर्वक माझा निर्णय घेतला आहे. शिवसेनेला फक्त मुंबईतच नाही, तर संपूर्ण देशात जिथे मजबूत करण्याची जबाबदारी दिली जाईल ती पार पाडेन, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले. तसेच, 10 वर्षे नि:स्वार्थपणे काँग्रसेमध्ये सेवा केली. मात्र, काँग्रसेमध्ये  मला गैरवर्तवणुकीचा सामना करावा लागला. आता यापुढे शिवसेनेच्या प्रसारासाठी काम करणार आहे. याशिवाय, काँग्रेसकडून मला लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ते भेटले नाही म्हणून मी पक्ष सोडलेला नाही, असा खुलासाही यावेळी प्रियंका चतुर्वेदींनी केला.  काही दिवसांपूर्वी प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिलं जात असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल त्यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी काँग्रसेच्या ट्विटर हँडललादेखील टॅग केलं होतं. यामुळे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसमधील नाराजी समोर आली होती. 

मागे

 प्रज्ञासिंहना कोर्टात हजर राहण्याचा आदेश...
प्रज्ञासिंहना कोर्टात हजर राहण्याचा आदेश...

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आजारपणाच्या क....

अधिक वाचा

पुढे  

लोकसभा निवडणूक 2019,मतदान कसं करतात?
लोकसभा निवडणूक 2019,मतदान कसं करतात?

देशात सध्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. पण मतदान कसं केलं जातं, त्य....

Read more