ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विरोधकांना भरते धडकी,राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ', म्हणताच

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 01:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विरोधकांना भरते धडकी,राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ', म्हणताच

शहर : मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून जरी माघार घेतली असली तरीही आज सर्वाधिक चर्चा राज ठाकरेंच्या सभांचीच आहे. प्रत्येक सभेत राज ठाकरे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोलखोल करत आहे. नांदेड आणि सोलापुरात राज यांच्या सभानंतर युतीने धसका घेतला आहे. ज्याप्रमाणे राज ठाकरे भाजपवर पुराव्यासहित हल्लाबोल करत आहे, त्यामुळे युती सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

राज ठाकरे भाषणात जेव्हा ते म्हणतात, लाव रे तो व्हिडिओ. त्यानंतर राज काय पोलखोल करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागते. विशेष करून भाजप नेत्यांच्या छातीत धडकी भरते अशी चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. नांदेड आणि सोलापूरच्या सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने व्हिडीओ स्क्रीनवर दाखवत खिल्ली उडवली.

प्रत्येक सभेत मोदींचे व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंनी सोलापूरच्या सभेत मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'होय माझ सरकार' जाहिरातीची पोलखोल केली. जाहिरातीत दाखवण्यात आलेल्या तरुणाला त्यांनी थेट स्टेजवर आणत सरकारच्या जाहिरातीचा बुरखा फाडला. एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्री किती खोट बोलतात हे देखील राज यांनी सभेत सांगितले.

राज ठाकरे भाजप विरोधात आपल्या सभा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज यांच्या  भाषणांनी युतीच्या उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे. राज यांची सभा आपल्या मतदारसंघात नकोच असे युतीच्या उमेदवारांना वाटत आहे. तर दुसरीकडे महाआघाडीच्या उमदेवार आपल्या मतदारसंघात राज ठाकरेंची सभा व्हावी

मागे

भाजपाकडून फेक मतदानासाठी बनावट बोटांची आयडिया ? काय आहे नेमकं गौडबंगाल  ?
भाजपाकडून फेक मतदानासाठी बनावट बोटांची आयडिया ? काय आहे नेमकं गौडबंगाल ?

लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचाराने जोर धरला असून बड्या नेत्यांच्या सभा चांग....

अधिक वाचा

पुढे  

“ए लाव रे तो व्हिडीओ”; राज ठाकरे आज कोल्हापुरात  काय दाखवणार?
“ए लाव रे तो व्हिडीओ”; राज ठाकरे आज कोल्हापुरात काय दाखवणार?

आज कोल्हापुरात राज यांची भाजपविरोधी प्रचारसभा होत आहे. राज ठाकरेंच्या या स....

Read more