ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपाकडून फेक मतदानासाठी बनावट बोटांची आयडिया ? काय आहे नेमकं गौडबंगाल ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 12:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपाकडून फेक मतदानासाठी बनावट बोटांची आयडिया ? काय आहे नेमकं गौडबंगाल  ?

शहर : देश

लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचाराने जोर धरला असून बड्या नेत्यांच्या सभा चांगल्याच गाजत आहेत. तर, पहिल्या टप्प्यातील मतदानादिवशी अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड असल्याचे समोर आले होते. तर, आता सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. त्यामध्ये हाताची बोटे दिसत असून निवडणुकांमध्ये फेक मतदान करण्यासाठी या बोटांचा वापर करण्यात येत असल्याचा संदेश या फोटोसह फिरत आहे. मात्र, याबाबतची सत्यता वेगळीच आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो 2017 च्या विधानसभा निवडणुकांवेळीही सर्वप्रथम इंटरनेटवर दिसून आले होते. त्यावेळीही, हे फोटो फेक मतदानासाठी वापरण्यात आलेल्या बोटांचा संदर्भ देत शेअर केले जात होते. तर, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनीही व्हॉट्सअॅपवर शेअर झालेला एक फोटो ट्विटरवर अपलोड करुन कुणी तरी हे पाठवलंय असे कॅप्शन लिहिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे फोटो चर्चेत आले असून याच नेमकं गौडबंगाल काय ? असा प्रश्न नेटीझन्स आणि नागरिकांना पडला आहे.

कुरेशी यांच्या ट्विटला अनेकांनी उत्तर देताना, हे फोटो युकजा सदस्यांसाठी कुत्रिम बोटांचे प्रतिनिधित्व करत असल्याचं म्हटलं आहे. एबीसी न्यूजने 2013 साली एक शोध पत्रकारितेचा अहवाल दिला होता. त्यानुसार, जपानमधील यकुजा या माफिया संघटनाचे प्रतिक म्हणून ही कापण्यात आलेली बोटे वापरली जातात. 'यूबीत्सुम'च्या नावे प्रसिद्ध असलेल्या एका प्रसंगात, यकुजा सदस्यांना गंभीर गुन्ह्याचे प्रायश्चित करण्यासाठी स्वत:च्या शरीरावरील अंगाचा भाग कापला जातो. विशेष करुन डाव्या हाताच्या करंगळीपासून या प्रायश्चित भोगण्याला सुरुवात केली जाते. तर, पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास, दुसऱ्या हाताची बोटे कापली जातात. विशेष म्हणजे हाताची ही तुटलेली बोटे पाहिल्यानंतर या लोकांना येथे कामही दिले जात नाही. दरम्यान, जपानद्वारे बनविण्यात आलेल्या खोट्या बोटांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निवडणुकांवेळी फेक मतदान करण्यासाठी ही बोटे वापरण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यात कुठलेही तथ्य नाही.

मागे

उत्तर प्रदेशमध्ये मोदींचा फोटो असलेले तिकीट दिल्याने दोन रेल्वे कर्मचार्‍यांचे निलंबन
उत्तर प्रदेशमध्ये मोदींचा फोटो असलेले तिकीट दिल्याने दोन रेल्वे कर्मचार्‍यांचे निलंबन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेले तिकीट प्रवाशांना दिल्याने दोन रेल्....

अधिक वाचा

पुढे  

विरोधकांना भरते धडकी,राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ', म्हणताच
विरोधकांना भरते धडकी,राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ', म्हणताच

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून जरी माघार घेतली असली तरीह....

Read more