ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स ८८८ अंकांनी वधारला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 20, 2019 10:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स ८८८ अंकांनी वधारला

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या (एक्झिट पोल) अंदाजानंतर सोमवारी भांडवली बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. आज बाजार उघडल्यानंतर भांडवली बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशकांनी मोठी झेप घेतली. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स ८८८.९१ अंकांनी वधारून ३८,८१९.९१ वर जाऊन पोहोचला आहे. तर निफ्टी २८८ अंकांनी वधारून ११,६९१.३० च्या पातळीवर जाऊन पोहोचला. त्यामुळे भांडवली बाजाराने एकप्रकारे मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार, या निर्णयाचे स्वागत केल्याचे मानले जात आहे. मोदी सरकार बहुमताने सत्तेत आल्यास आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम पुढे सुरु राहील. त्यामुळे उद्योगांच्यादृष्टीने स्थिर आणि अनुकूल वातावरण निर्माण होईल, असा अनेकांचा अंदाज आहे.

लोकसभा निवडणुकीचे सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. यानंतर प्रथेप्रमाणे विविध संस्थांकडून निकालपूर्व चाचण्यांचे (एक्झिट पोल) निकाल जाहीर करण्यात आले. यापैकी जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी विरोधकांकडून एनडीएला यंदा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असा दावा केला जात होता. त्यामुळे त्रिशंकु परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज समोर आल्यानंतर हे सर्व दावे फोल ठरले आहेत.

देशातील प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज

* टाइम्स नाऊव्हीएमआर: एनडीए३०६, यूपीए- १३२, अन्य१०४

* इंडिया न्यूजएनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य१२७

* रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोलजन की बातचा आहे. त्यानुसार

रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए१२८, अन्य१२७

रिपब्लिक टीव्हीजन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य८७

 

* एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य११५

* आयएएनएस- सी व्होटर: भाजप- २३६, काँग्रेस८० एनडीए- २८७

* नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए१६४, अन्य१३६

* न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए६२- ७२

* एबीपीनेल्सन : एनडीए२६७, यूपीए१२७, अन्य १४८ (भाजप२१८, काँग्रेस ८१)

मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद ....

अधिक वाचा

पुढे  

एक्झिट पोल : 'टीव्ही बंद करायची वेळ आलेय, सर्व एक्झिट पोल चुकीचे असू शकत नाहीत'
एक्झिट पोल : 'टीव्ही बंद करायची वेळ आलेय, सर्व एक्झिट पोल चुकीचे असू शकत नाहीत'

लोकसभा निवडणुकीचे सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. यान....

Read more