ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एक्झिट पोल : 'टीव्ही बंद करायची वेळ आलेय, सर्व एक्झिट पोल चुकीचे असू शकत नाहीत'

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 20, 2019 11:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30

एक्झिट पोल : 'टीव्ही बंद करायची वेळ आलेय, सर्व एक्झिट पोल चुकीचे असू शकत नाहीत'

शहर : देश

लोकसभा निवडणुकीचे सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. यानंतर प्रथेप्रमाणे विविध संस्थांकडून मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निकाल जाहीर करण्यात आले. यापैकी जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी विरोधकांकडून एनडीएला यंदा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असा दावा केला जात होता. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज समोर आल्यानंतर हे सर्व दावे फोल ठरताना दिसत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून याविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही करून नापसंती दर्शविली आहे. त्यांनी म्हटले की, टीव्ही बंद करायची आणि सोशल मीडियावरून लॉग आऊट वेळ आली आहे. कारण सर्वच एक्झिट पोल चुकीचे असणे शक्य नाही. आता केवळ २३ तारखेची वाट पाहायची, त्यादिवशी पृथ्वी अजूनही आपल्या अक्षावरच फिरत आहे, हे सिद्ध होईल, असे अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तत्पूर्वी काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. माझ्या मते एक्झिट पोल हे चुकीचे आहेत. मागील आठवड्यात ऑस्ट्रेलियामध्ये ५६ एक्झिट पोल चुकीचे ठरले होते. भारताचं म्हणाल तर, येथील जनता मोठ्या प्रमाणावर सत्य सांगण्यापासून दूर राहते. आपण निवडणुकांच्या अंतिम आणि तितक्याच खऱ्या निकालांची वाट पाहू, असे थरूर यांनी म्हटले.लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात ६२ टक्के इतके मतदान झाले. येत्या २३ तारखेला मतमोजणी होईल.

 

मागे

एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स ८८८ अंकांनी वधारला
एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स ८८८ अंकांनी वधारला

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांच....

अधिक वाचा

पुढे  

एक्झिट पोल म्हणजे ईव्हीएम यंत्रे बदलण्याचा किंवा  फेरफार करण्याचा  डाव- ममता बॅनर्जी
एक्झिट पोल म्हणजे ईव्हीएम यंत्रे बदलण्याचा किंवा फेरफार करण्याचा डाव- ममता बॅनर्जी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांच्या (एक्झिट पोल) निकालांवर कोणीह....

Read more