ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ममतादीदींचे 40 आमदार मोदींच्या संपर्कात

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 06:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ममतादीदींचे 40 आमदार मोदींच्या संपर्कात

शहर : kolkata

मोदी यांनी केलेल्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण, लोकसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीचे अनेक खासदार भाजपात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील सेरमपूर येथील सभेत बोलत होते. यावेळी बोलताना मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक आमदार तृणमूल काँग्रस पक्षाला रामराम करतील. आजही 40 आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. दीदी, तुमचं वाचणं कठीण आहे, कारण तुम्ही विश्वासघात केलाय, अशा शब्दात मोदींनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला.
दगड-माती पासून बनवलेले रसगुल्ले मोदींना खाऊ घालायचे आहेत. असं काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. त्यावर बोलताना मोदी म्हणाले की, वाह.. माझे हे सौभाग्यच आहे. ज्या मातीवर रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, चैतन्य महाप्रभू, नेताजी सुभाष चंद्र बोस, श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या महापुराषांचा जन्म झालेल्या मातीतील रसगुल्ले म्हणजे माझ्यासाठी प्रसादच आहे.

मागे

मोदींच्या विरुधात बडतर्फ बीएसएफ जवान तेज बहादुरला उमेदवारी
मोदींच्या विरुधात बडतर्फ बीएसएफ जवान तेज बहादुरला उमेदवारी

ऐनवेळी समाजवादी पक्षाने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात उतरवलेला आपला उमे....

अधिक वाचा

पुढे  

सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.07  टक्के मतदान
सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.07  टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात सायंकाळी 5 वाज....

Read more