ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उत्तर प्रदेशमध्ये मोदींचा फोटो असलेले तिकीट दिल्याने दोन रेल्वे कर्मचार्‍यांचे निलंबन

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 12:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उत्तर प्रदेशमध्ये मोदींचा फोटो असलेले तिकीट दिल्याने दोन रेल्वे कर्मचार्‍यांचे निलंबन

शहर : bahraich

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेले तिकीट प्रवाशांना दिल्याने दोन रेल्वे कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे.  ही घटना उत्तर प्रदेशातील बारांबाकी रेल्वे स्थानकावर घडला. सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने ही कारवाई करण्यात आली.रेल्वे अधिकार्‍यांच्या हवाल्याने एएनआयने  दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी बारांबाकी रेल्वे स्थानकामधील दोन कर्मचार्‍यांनी प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले तिकीट दिले होते. मात्र, सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने सरकारी व्यासपीठावरून अशा प्रकारे जाहीरताबाजी करणे आचारसंहितेचे उल्लंघन ठरते. दरम्यान, या रेल्वे स्थानकात सुरुवातीला मोदींचा फोटो नसलेल्या कागदाच्या रोलवर छापलेली तिकीटे प्रवाशांना दिली गेली होती. मात्र, या कर्मचार्‍यांची शिफ्ट संपल्यानंतर त्याजागी दुसरे कर्मचारी आले आणि त्याचवेळी तिकीटाच्या कागदाचा रोल संपल्याने या कर्मचार्‍यांनी चुकून मोदींचा फोटो असलेला रोल मशीनला लावला आणि त्यावर तिकीटे छापली आणि ती अनावधानाने प्रवाशांना देण्यात आली, असे या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांनी म्हटले आहे.
 

मागे

लोकसभा निवडणूक २०१९ :या मतदारसंघात लोकसभा निवडणूक रद्द होण्याची शक्यता
लोकसभा निवडणूक २०१९ :या मतदारसंघात लोकसभा निवडणूक रद्द होण्याची शक्यता

लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध ठिकाणी घोडेबाजाराला....

अधिक वाचा

पुढे  

भाजपाकडून फेक मतदानासाठी बनावट बोटांची आयडिया ? काय आहे नेमकं गौडबंगाल  ?
भाजपाकडून फेक मतदानासाठी बनावट बोटांची आयडिया ? काय आहे नेमकं गौडबंगाल ?

लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचाराने जोर धरला असून बड्या नेत्यांच्या सभा चांग....

Read more