ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2020 10:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

शहर : मुंबई

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. नितीन गडकरी यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्वीट करुन सांगितलं की, “काल मला अशक्तपणा जाणवत होता. त्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणी केल्यानंतर माझी कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

नितीन गडकरी यांनी पुढे म्हटलं की, सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सोबत असून मी ठिक आहे. मी स्वत:ला वेगळं केलं आहे. मी सर्वांना विनंती करतो की जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी सावधगिरी बाळगून नियमांचे पालन केले पाहिजे. सुरक्षित रहा.

आतापर्यंत मोदी सरकारमधील अनके मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, धर्मेंद्र प्रधान, गजेंद्रसिंग शेखावत, श्रीपाद नाईक आणि सुरेश अंगडी यांचा समावेश आहे.

 

पुढे  

पंतप्रधान मोदींचा 70वा वाढदिवस, 'या' कार्यक्रमांचं आयोजन!
पंतप्रधान मोदींचा 70वा वाढदिवस, 'या' कार्यक्रमांचं आयोजन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी यांचा जन्म 1....

Read more