ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुसमोर 188 धावांचे आव्हान

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 06:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुसमोर 188 धावांचे आव्हान

शहर : delhi

सलामीवीर शिखर धवनच्या फटकेबाजीने दिल्ली कॅपिटल्सने बेंगळूरुविरुद्ध दमदार सुरुवात केली आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ स्वस्तात बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करत अर्धशतके केली. त्यानंतर दिल्लीचा डाव कोसळला. दिल्लीची अवस्था 12.2 षटकांत 1 बाद 103 वरून 16 षटकांत 4 बाद 131 झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.  दिल्ली कॅपिटल्स संघासमोर पुन्हा एकदा विजयी लय मिळालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघाचे आव्हान असणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्या आरसीबीने गेल्या तीन सामन्यांत कमालीचा फॉर्म दाखवला आहे. फिरोज शाह कोटलावर होणारा हा सामना कोहलीसाठी घरच्या मैदानावर होणार असला तरीही रिकी पाँटिंग व सौरभ गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्या दिल्लीसमोर तो कसा खेळ करतो हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
गुणतालिकेत दिल्लीचा संघ हा तिसर्या स्थानी आहे. त्यांच्यापुढे चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स हे संघ आहेत. या सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे 16 गुण होतील.सलग दोन पराभवांनंतर दिल्लीच्या संघाने आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळवला होता. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार्या दिल्लीचा आत्मविश्वास दुणावला असेल. आरसीबीने कोलकता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध विजय मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचे 11 सामन्यानंतर 8 गुण झाले आहेत.

मागे

राजस्थानचा हैदराबादवर ’रॉयल’ दणदणीत विजय
राजस्थानचा हैदराबादवर ’रॉयल’ दणदणीत विजय

राजस्थाने सनरायझर्स हैदराबादवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. राजस्थान....

अधिक वाचा

पुढे  

दिल्लीचा ’रॉयल’ विजय
दिल्लीचा ’रॉयल’ विजय

सलामीवीर पृथ्वी शॉ स्वस्तात बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने शान....

Read more