ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राजस्थानचा हैदराबादवर ’रॉयल’ दणदणीत विजय

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 03:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राजस्थानचा हैदराबादवर ’रॉयल’ दणदणीत विजय

शहर : मुंबई

राजस्थाने सनरायझर्स हैदराबादवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. राजस्थानचा हा 12 पैकी पाचवा विजय आहे. गुणतालिकेत राजस्थान सहाव्या स्थानी पोहोचला असून, प्ले-ऑफच्या आशा कायम आहेत. मनीष पांडेच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने शनिवारी आयपीएल क्रिकेट सामन्यात यजमान राजस्थान रॉयल्ससमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले. मागील सामन्यात हैदराबादने राजस्थान रॉयल्सला हरविले होते, तशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी हैदराबाद संघ उत्सुक होता. नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. चौथ्या षटकात श्रेयस गोपाळने केन विल्यमसनला बाद केले. त्यानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी सनरायझर्स हैदराबादला शतकी टप्पा पार करून दिला होता. ही जोडी खेळपट्टीवर असताना हैदराबाद संघ पावणेदोनशे धावांचा टप्पा पार करेल, असे वाटत होते. मात्र, तेराव्या षटकात ओशेन थॉमसने वॉर्नरला बाद केले. वॉर्नरने 32 चेंडूंत 37 धावांची खेळी केली. त्यानंतर मनीषने विजय शंकरच्या साथीने हैदराबादला 125 धावांच्या जवळ पोचविले. श्रेयस गोपाळने मनीषला सॅमसनकरवी झेलबाद केले. मनीषने 36 चेंडूंत 9 चौकारांसह 61 धावांची खेळी केली. अखेरच्या टप्प्यात रशीद खानने 8 चेंडूत एक चौकार आणि एका षटकारासह नाबाद 17 धावा केल्या, त्यामुळे हैदराबादला दीडशे धावांचा टप्पा पार करता आला. हैदराबादचे 161 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान संघानं सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड ठेवली. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि लिविंगस्टन या जोडीनं 78 धावांची सलामी दिली. रहाणेनं 34 चेंडूंत 39 धावा केल्या. तर लिविंगस्टननं 26 चेंडूंत 44 धावा केल्या. त्यानंतर संजू सॅमसननं 32 चेंडूत 48 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

मागे

काऊंटीमध्ये हॅम्पशायरकडून खेळणारा अजिंक्य रहाणे पहिला भारतीय
काऊंटीमध्ये हॅम्पशायरकडून खेळणारा अजिंक्य रहाणे पहिला भारतीय

वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झालेला भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे नव्या टी....

अधिक वाचा

पुढे  

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुसमोर 188 धावांचे आव्हान
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुसमोर 188 धावांचे आव्हान

सलामीवीर शिखर धवनच्या फटकेबाजीने दिल्ली कॅपिटल्सने बेंगळूरुविरुद्ध दमदा....

Read more