ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

World Cup 2019: अन्य संघ पाकिस्तानला घाबरतात...कर्णधार सर्फराज अहमद

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 31, 2019 12:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

World Cup 2019: अन्य संघ पाकिस्तानला घाबरतात...कर्णधार सर्फराज अहमद

शहर : देश

लंडन, वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडच्या विजयाने सुरू झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत आज वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान हे दोन बेभरवशी संघ समोरासमोर येणार आहेत. या संघांची कामगिरी कशी होईल, याचा अंदाज भल्याभल्यांना बांधता येत नाही. त्यामुळे त्यांना बेभरवशी हा टॅग लागला आहे. पण, याच टॅगमुळे अन्य संघ आम्हाला घाबरत असल्याचा दावा पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने केला आहे. 

सर्फराज म्हणाला,''बेभरवशी हा ठपका लागल्याचा आनंद आहे. त्यामुळे पाकिस्तानला अन्य संघ घाबरतात. पाकिस्तान संघ तसा घातकीच आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये आम्हाला बेभरवशी या टॅगसह दाखल होण्याचा आनंदच आहे. याने आम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी ऊर्जा मिळते.'' 

ट्रेंट ब्रिजवर मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. गतवर्षी इंग्लंडने याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 481 धावांची विक्रमी धावसंख्या उभारली होती. पाकिस्ताननेही येथे मागील महिन्यात त्यांच्या वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम ( 340) धावा चोपल्या होत्या. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील जेतेपदातून प्रेरणा घेण्याचा पाकिस्तान संघ प्रयत्न करेल. स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाने 4-1 ने पराभूत केले होते, तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामी लढतीत भारताविरुद्ध 124 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानने त्यानंतर दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि इंग्लंड यांचा पराभव करीत अंतिम फेरीत स्थान मिळवले आणि भारताचा पराभव करत जेतेपद पटकावले. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीही पाकिस्तान संघाला 10 वन डे सामन्यांत विजय मिळवण्यात अपयश आले आहे. सराव सामन्यातही त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता.

मागे

World Cup 2019 : क्रिकेट विश्वचषकापूर्वी कर्णधारांची 'विराट' फौज राणीच्या भेटीला
World Cup 2019 : क्रिकेट विश्वचषकापूर्वी कर्णधारांची 'विराट' फौज राणीच्या भेटीला

क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व दहा स्पर्धक राष्ट्रांच्या ....

अधिक वाचा

पुढे  

वर्ल्ड कप २०१९ :  पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं
वर्ल्ड कप २०१९ : पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं

वर्ल्ड कप २०१९च्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा अक्षरश: ध....

Read more