ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जसप्रीत बुमराहच्या षटकारामुळे इंग्लंड बॅकफूटवर, नोंदवला आणखी एक विक्रम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2024 07:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 जसप्रीत बुमराहच्या षटकारामुळे इंग्लंड बॅकफूटवर, नोंदवला आणखी एक विक्रम

शहर : मुंबई

भारत आणि इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावावर टीम इंडियाची मजबूत पकड दिसली. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कमाल दाखवली आणि विक्रमाची नोंद केली.

भारताने पहिल्या डावात 396 धावांची खेळी केली होती. सकाळी डाव आटोपला आणि इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला. इंग्लंडने बेझबॉल रणनिती अवलंबत आक्रमक सुरुवात केली. पण इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 253 धावांवर तंबूत परतला.

जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला. जसप्रीत बुमराहने इंग्लंडचे सहा गडी बाद केले. यासह जसप्रीत बुमराहच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.

बुमराहने ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, टॉम हार्टली आणि जेम्स अँडरसन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बुमराहने कसोटीत 10व्यांदा 5 विकेट घेण्याचा मोठा पराक्रम केला.

भारताकडून कसोटीत कमी चेंडूत 150 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराहने 6781 चेंडूत 150 विकेट्स घेतले. तर उमेश यादवने 7761 चेंडूत 150 विकेट्स, मोहम्मद शमीने 7755 चेंडूत 150, तर कपिल देवने 8378 चेंडूत 150 विकेट्स घेतले आहेत.

बुमराह सर्वात वेगवान 150 बळी घेणारा दुसरा आशियाई गोलंदाज ठरला आहे. वकार युनूस या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. बुमराहने 34 कसोटीत 150 बळी पूर्ण केले आहेत. तर युनूसने केवळ 27 कसोटीत 150 बळी घेतले.

जसप्रीत बुमराहच्या नावावर 20.40 च्या सरासरीने 151 विकेट आहेत. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात केवळ दोनच गोलंदाजांनी त्याच्यापेक्षा चांगल्या सरासरीने जास्त विकेट्स घेतल्या आहेत. 16.43 च्या सरासरीने सिडनी बार्न्स आणि 20.53 च्या सरासरीने एलन डेव्हिडन यांनी विकेट्स घेतल्या आहेत.

 

मागे

विषप्रयोग झालेला क्रिकेटपटू कधीपर्यंत बोलू शकणार ? हेल्थ अपडेट काय ?
विषप्रयोग झालेला क्रिकेटपटू कधीपर्यंत बोलू शकणार ? हेल्थ अपडेट काय ?

सामना खेळून आल्यावर या क्रिकेटपटून विमानात पाणी समजून दुसरंच लिक्विड प्या....

अधिक वाचा

पुढे  

 कॅप्टन रोहित शर्मासाठी वाईट बातमी, हिटमॅन नावाला लागला कलंक, नेमकं काय झालं?
कॅप्टन रोहित शर्मासाठी वाईट बातमी, हिटमॅन नावाला लागला कलंक, नेमकं काय झालं?

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेदरम्यान रोहित शर्मासाठी वाईट बातम....

Read more