ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विषप्रयोग झालेला क्रिकेटपटू कधीपर्यंत बोलू शकणार ? हेल्थ अपडेट काय ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2024 12:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विषप्रयोग झालेला क्रिकेटपटू कधीपर्यंत बोलू शकणार ? हेल्थ अपडेट काय ?

शहर : मुंबई

सामना खेळून आल्यावर या क्रिकेटपटून विमानात पाणी समजून दुसरंच लिक्विड प्यायलं. मात्र त्यामुळे त्याला त्रास होऊ लागला आणि प्रकृती बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याच्या तब्येतीबद्दल नवी माहिती समोर आली आहे.

भारतीय संघातील तडाखेबाज फलंदाज आणि कर्नाटक संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल याची तब्येत मंगळवार, 30 जानेवारील अचानक बिघडली. सध्या त्याच्यावर त्रिपुरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विमानात पाणी समजून दुसराच लिक्विड पदार्थ प्यायल्यान मयमंकला त्रास होऊ लागला. त्याच्या तोंडात जळजळ झाली आणि उलट्याही होऊ लागल्या. त्याल तातडीने विमानातून उतरवून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ माजली. त्याला नेमकं काय झालं ? अशी सर्वच चाहत्यांना चिंता वाटू लागली.

आता त्याच्या प्रकृतीबद्दल नवे अपडेट्स समोर आले आहेत. आधी जी माहिती समोर आली त्यानुसार, मयंकची प्रकृती स्थिर असून तो आता धोक्याबाहेर आहे. पण आता त्याच्याबद्दल क्षणा-क्षणाला नवी माहिती समोर येत आहे. त्यानुसार, मयंकच्या तोंडात अजूनही सूज असून व्रणही आहेत. तो रणजी ट्रॉफीचे पुढचे काही सामने तरी खेळू शकणार नाही. सध्या तो कर्नाटक संघाचं कप्तानपद भूषवत आहे.

कधीपर्यंत करणार मयंक कमबॅक ?

 

मयंक अग्रवालॉ सध्याच्या रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने चार सामन्यांमध्ये 400 हून अधिक धावा केल्या होत्या ज्यात दोन शतकांचा समावेश होता. 29 जानेवारीला त्रिपुराविरुद्धच्या विजयानंतर, तो आपल्या संघासह सुरतला निघाला होता, जिथे 2 फेब्रुवारीपासून कर्नाटकला रेल्वेविरुद्ध खेळायचे होते. मात्र आता प्रकृतीच्या कारणास्तव त्याला हा सामना मिस करावा लागेल. कर्नाटक संघाच्या टीम मॅनेजरने ही माहिती दिली. 9 फेब्रुवारीपासून चेन्नईत होणाऱ्या तामिळनाडू विरुद्धच्या सामन्यासाठी मयंक फिट होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दोन दिवस बोलू शकणार नाही मयंक

तसेच टीम मॅनेजरने हेही सांगितलं की मयंकच्या तोंडात अजूनही फोड आले आहेत. त्याने सोशल मीडिया अकाऊंटवरूनही एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याच्या तोंडावरील सूज स्पष्ट दिसत होती. टीम मॅनेजरच्या सांगण्यानुसार, तोंडाला सूज आल्याने मंयक अजून 48 तास म्हणजेच दोन दिवस तरी बोलू शकणार नाही.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात नव्या अपडेट्सची प्रतिक्षा आहे. या संपूर्ण प्रकरणात हत्येचा कट असल्याच्याही अफवा उठत आहेत. पाण्यात विषारी द्रव्य होते तर अन्य प्रवाशांना काही का झालं नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ मयंकसोबतच हा प्रकार का घडला याचा तपास सुरू आहे. तर त्रिपुरा पोलीसही या प्रकरणात गुंतले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे सत्य काय आहे ते शोधून काढू, असे पोलिसांनी सांगितले.

मयंकनेही शेअर केली पोस्ट

मयंकने एक्स (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक पोस्ट केली . त्याने त्याचे रुग्णालयातील 2 फोटो शेअर केले आहेत. तसेच मयंकने या पोस्टमध्ये आपल्या तब्येतीबाबत माहिती देत चाहत्यांचे आभार मानले आहेत. “मला आता बरं वाटतंय. मी कमबॅकसाठी तयारीला लागणार आहे. तुमच्या प्रार्थना, प्रेम आणि पाठिंब्यासाठी मी आपला आभारी आहे, असं लिहीत मयंकने चाहत्यांना धन्यवाद दिलं.

मागे

इंग्लंड विरुद्ध 300 धावा फटकावणारा प्लेयर निघाला इंग्लंडला, 7 वर्षापासून टीम इंडियाच्या बाहेर
इंग्लंड विरुद्ध 300 धावा फटकावणारा प्लेयर निघाला इंग्लंडला, 7 वर्षापासून टीम इंडियाच्या बाहेर

टीम इंडियाचा हा प्लेयर इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक इनिंग खेळलाय. बऱ्याच काळाप....

अधिक वाचा

पुढे  

 जसप्रीत बुमराहच्या षटकारामुळे इंग्लंड बॅकफूटवर, नोंदवला आणखी एक विक्रम
जसप्रीत बुमराहच्या षटकारामुळे इंग्लंड बॅकफूटवर, नोंदवला आणखी एक विक्रम

भारत आणि इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावावर टीम इंडियाची मज....

Read more