ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

World Cup 2019 :इंग्लंड मधील भारतीय खेळाडुंचा सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 06, 2019 06:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

World Cup 2019 :इंग्लंड मधील भारतीय खेळाडुंचा सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

शहर : मुंबई

इंग्लंडमध्ये श्रीलंका  विरुद्ध भारत असा सामना सुरू असताना आकाशात मैदानाभोवती  'जस्टीस फॉर कश्मीर' असे बॅनर लावलेल्या हेलिकॉप्टरने पाच घिरत्या मारल्याने पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

याआधी भारतीय संघ राहत असलेल्या हॉटेल मध्ये लोकांची ये जा वाढल्यामुळे बीसीसीआय ने आयसीसी कडे भारतीय संघाची सुरक्षा वाढविण्याची मागणी केली होती. त्यानंतर संशयित हेलिकॉप्टरने घिरटया घातल्याचे स्पष्ट होताच बीसीसीआय आणि आयसीसी भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कोणती पाऊले उचलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशी घटना अफगाणिस्तान विरूद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान घडली होती. त्यावेळी ' जस्टिस फॉर बलुचिस्तान' असे बॅनर लावलेल्या विमानाने स्टेडिअम भोवती घिरट्या घातल्या होत्या. याचा कोणताही तपास अद्याप समोर आलेला नाही. उलट याकडे स्थानिक सुरक्षा व्यवस्था  आणि आयसीसीने दुर्लक्षच केल्याचे बोलले जाते.

भारत श्रीलंका सामान्या दरम्यान घिरट्या घालणारे हेलिकॉप्टर कोणाचे होते ? त्यात कोण व्यक्ति होत्या? याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. परंतु आयसीसी आणि स्थानिक पोलिसांनी घटना खूपच गांभीर्याने घेतली आहे.

 

मागे

रोहितनं ठोकलेल्या'सिक्सर'नं जखमी झालेल्या महिलेचं असं जिंकलं मन
रोहितनं ठोकलेल्या'सिक्सर'नं जखमी झालेल्या महिलेचं असं जिंकलं मन

भारताचा बॅटसमन रोहित शर्मा आयसीसी वर्ल्ड कप मध्ये आपल्या खेळण्यानं क्रिके....

अधिक वाचा

पुढे  

श्रीलंका 7 गडी बाद 264
श्रीलंका 7 गडी बाद 264

आजच्या श्रीलंका विरुद्ध भारत सामन्यात श्रीलंका च्या म्याथुज च्या 113 व थिर....

Read more