ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020 : सनरायझर्स हैदराबादचा पहिला विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2020 10:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020 : सनरायझर्स हैदराबादचा पहिला विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव

शहर : मुंबई

आयपीएल 2020 च्या 11व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव केला. हैदराबादने समोर ठेवलेलं 163 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावत 147 धावा काढल्या. सनरायझर्स हैदराबादचा स्टार गोलंदाज राशिद खानने प्रतिस्पर्धी संघाला फक्त 14 धावांतच तीन विकेट्स घेतले. त्याच्याव्यतिरिक्त गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही दोन विकेट्सची भर घातली.

हैदराबादचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. भुवनेश्वरने पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूंतच दिल्लीचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉला बाद केलं. दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवनने 40 धावांची भागीदारी केली. अय्यरने 17 धावा काढल्या त्यानंतर मात्र राशिद खानने टाकलेल्या चेंडूंवर तो बाद झाला. त्यानंतर रिषभ पंतने 28, शिखर धवनने 34 तर हेटमॉयरने 21 धावां काढल्या.

त्याआधी सनरायझर्स हैदराबादचा संघ फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. हैदराबादने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावत 162 धावांचा स्कोअर केला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये अयशस्वी राहिलेला कर्णधार डेविड वॉर्नरने कालच्या सामन्यात 33 चेंडूंमध्ये 45 धावा केल्या. त्याने तीन चौकार आणि दोन षटकार फटकावले. वॉर्नर आणि बेयरस्टोने या जोडीने एकूण 77 धावा केल्या.

वॉर्नरला लेग स्पिनर अमित मिश्राने बाद केलं. वॉर्नर बाद झाल्यानंतर क्रीजवर मनीष पांडे खेळण्यासाठी उतरला परंतु, तो फक्त तीन धावा काढूनच माघारी परतला. आयपीएल 2020 मधील आपला पहिला सामना खेळणाऱ्या केन विलियमसनने 26 चेंडूंमध्ये 41 धावा काढल्या. त्याव्यतिरिक्त फलंदाज बेयरस्टोने 48 चेंडूंत 53 धावा काढल्या. दिल्लीच्या वतीने रबाडा आणि अमित मिश्राने दोन-दोन विकेट्स घेतल्या.

मागे

अवघ्या 22 वर्षांचा इशान, 58 चेंडूत 99 धावा ठोकून 'विराट' सेनेचा घाम फोडला
अवघ्या 22 वर्षांचा इशान, 58 चेंडूत 99 धावा ठोकून 'विराट' सेनेचा घाम फोडला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज इशान ....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2020 | राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू
IPL 2020 | राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू

आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) 12 वा सामना 30 सप्टेंबरला खेळण्यात आला. हा 12 वा स....

Read more