ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020 | राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2020 07:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020 | राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू

शहर : मुंबई

आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) 12 वा सामना 30 सप्टेंबरला खेळण्यात आला. हा 12 वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने सलग 2 सामने जिंकणाऱ्या राजस्थानचा 37 धावांनी एकतर्फी पराभव केला. या सामन्यात जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) 4 ओव्हर टाकल्या. यात त्याने 4. 50 च्या इकोनॉमीने अवघ्या 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. यात सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार दिनेश कार्तिकला बाद केले. जोफ्राने आपल्या बोलिंग दरम्यान एक विक्रम केला आहे.

काय आहे विक्रम?

जोफ्रा आर्चरने सामन्याच्या पहिल्या डावात हा विक्रम केला. कोलकाता विरुद्ध बोलिंग करताना आर्चरने 13 व्या ओव्हरमधील चौथा बोल चक्क ताशी  150 किमीपेक्षा अधिक वेगाने टाकला. आर्चरने हा बोल ताशी 151. 4 किलोमीटर  वेगाने टाकला. यासह आर्चरने आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली आहे. आर्चर आयपीएल 2020 मध्ये सर्वात वेगवान बोल टाकणारा बॉलर ठरला. याआधी जोफ्रा आर्चरने 2018 मध्येही अशीच कामगिरी केली होती. जोफ्राने 2018 मध्ये ताशी 152. 39  किमी वेगाने बोल टाकला होता.दरम्यान याआधी 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत जोफ्रा आर्चरने असाच वेगवान बोल टाकला होता. आर्चरने बांग्लादेश विरुद्धातील सामन्यात चक्क ताशी 153 किमीच्या वेगाने बॉल टाकला होता.

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात वेगाने बोल टाकण्याचा विक्रम बोलर डेल स्टेनच्या (Dale Steyn) नावावर आहे. स्टेनने डेक्कन चार्जर्सकडून खेळताना ताशी  154. 40 किमी इतक्या वेगाने बोल टाकण्याचा कारनामा केला होता.

जोफ्रा आर्चरची आयपीएल कारकिर्द

जोफ्रा आर्चरने 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं. आर्चरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 24 सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 29 विकेट्स घेतल्या आहेत. 3/15 ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. तसेच जोफ्राने बॅटिंगद्वारे 128 धावा केल्या होत्या. 27 नाबाद ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.

मागे

IPL 2020 : सनरायझर्स हैदराबादचा पहिला विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव
IPL 2020 : सनरायझर्स हैदराबादचा पहिला विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव

आयपीएल 2020 च्या 11व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 15 धाव....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2020 : KKR च्या विजयानंतर बदलली पॉइंट टेबलची समीकरणं
IPL 2020 : KKR च्या विजयानंतर बदलली पॉइंट टेबलची समीकरणं

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये काल झालेल्या सामन्यानंतर आ....

Read more