ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020 : KKR च्या विजयानंतर बदलली पॉइंट टेबलची समीकरणं

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2020 05:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020 : KKR च्या विजयानंतर बदलली पॉइंट टेबलची समीकरणं

शहर : मुंबई

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये काल झालेल्या सामन्यानंतर आयपीएलच्या पॉइंट टेबल्समध्ये चेंजेस झाले आहे. सामन्याच्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्स पहिल्या क्रमांकावर होती. तर कोलकाता नाीट रायडर्स सातव्या क्रमांकावर होती. परंतु, कालच्या सामन्यात कोलकाताने विजय मिळवत 37 धावांनी राजस्थानचा पराभव केला. त्यानंतर पॉइंट टेबलमधील संघांचं स्थानही बदलंलं आहे. कोलकाताचा संघ कालच्या विजयामुळे सातव्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाला सामना खेळल्याविनाच पॉइंट टेबलमध्ये फायदा झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. हैदराबाद विरूद्धच्या पराभवानंतर दिल्लीला आपलं पहिलं स्थान गमवावं लागलं होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये बाजी मारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

खास गोष्ट म्हणजे, पहिल्या चार क्रमांकांवर असलेल्या संघांनी आपल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. तर प्रत्येकी एका सामन्यात पराभव झाला आहे. तसेच त्यानंतरच्या क्रमांकावर असलेल्या संघांना तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर आहे. तर सनरायझर्स हैदराबाद सातव्या स्थानावर आहे. तर धोनी नेतृत्त्व करत असलेला संघ सलग दोन पराभवांनंतर आठव्या म्हणजेच, शेवटच्या स्थानी आहे.

ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपमध्ये कोणताही बदलाव नाही

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये झालेल्या सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल 222 धावांसह ऑरेंज कॅपचा दावेदार आहे. तसेच मयंक अग्रवाल दुसऱ्या आणि डुप्लेसिस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू रबाडाने मंगळवारी झालेल्या सामन्यात शमीला मागे टाकत पर्पल कॅप आपल्याकडे घेतली आहे. रबाडाने 7 विकेट्स घेत पर्पल कॅप आपल्याकडे घेतली आहे. शमीने सुद्धा 7 विकेट्स घेतल्या आहेत. पण त्याचा इकॉनॉमी रेट रबाडाहून अधिक आहे.

मागे

IPL 2020 | राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू
IPL 2020 | राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू

आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) 12 वा सामना 30 सप्टेंबरला खेळण्यात आला. हा 12 वा स....

अधिक वाचा

पुढे  

यूएईत 4 नोव्हेंबरला सुरु होणार महिलांची मिनी आयपीएल
यूएईत 4 नोव्हेंबरला सुरु होणार महिलांची मिनी आयपीएल

महिला क्रिकेटर्सचा 'मिनी आयपीएल' म्हणजेच चॅलेन्जर सीरिज 4 ते 9 नोव्हेंबर द....

Read more