ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2021| ख्रिस मॉरिसला सर्वात मोठी रक्कम, एकूण 57 खेळाडूंचा लिलाव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 19, 2021 07:40 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2021| ख्रिस मॉरिसला सर्वात मोठी रक्कम, एकूण 57 खेळाडूंचा लिलाव

शहर : मुंबई

गुरुवारी चेन्नई येथे जाहीर झालेल्या खेळाडूंच्या लिलावात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या मोसमासाठी अष्टपैलू क्रिकेटपटू कृष्णप्पा गौतमला चेन्नई सुपर किंग्जने 9.25 कोटी रुपयांची जोरदार बोली लावली गेली. कृष्णप्पाची बेस किंमत 20 लाख रुपये होती तर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादने देखील त्याला खरेदी करण्यासाठी बोली लावली होती.

कोलकाताने कृष्णाप्पासाठी एक कोटीपर्यंत बोलली लावली. पण हैदराबादने त्या सर्वांपेक्षा पुढे जाऊन कृष्णाप्पासाठी पाच कोटी रुपयांची बोली लावली. यानंतर चेन्नई सुपर किंग्जनेही बोलीमध्ये उडी मारली आणि अष्टपैलू कृष्णाप्पाला 9.25 कोटी रुपयांच्या जोरदार बोलीसह खरेदी केले.

ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तो 16 कोटी 25 लाखांना विकला गेला आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले आहे. मॉरिसने युवराज सिंगचा विक्रम मोडला आहे. युवराजला याआधी 16 कोटींना खरेदी केले गेले होते.

ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू Jhye Richardson ला  Punjab Kings ने 14 कोटींना खरेदी केले. त्याची बेस प्राईस 1.50 कोटी होती.

ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलसाठी विक्रमी बोली लावली जात आहे. आरसीबीने बाजी मारली. फ्रँचायझीने त्याला 14.25 कोटीमध्ये खरेदी केले आहे. मॅक्सवेलला विकत घेण्यासाठी आरसीबी आणि सीएसकेमध्ये चढाओढ झाली.

Kyle Jamieson ला Royal Challengers Bangalore ने तब्बल 15 कोटींना खरेदी केले.

मागे

IND VS ENG: मॅचमध्ये भडकला, Virat Kohli, घेतला अम्पायरशी पंगा
IND VS ENG: मॅचमध्ये भडकला, Virat Kohli, घेतला अम्पायरशी पंगा

टीम इंडिया आणि इंग्लंड (IND VS ENG) यांच्यात खेळला जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्या....

अधिक वाचा

पुढे  

….म्हणून मुंबई इंडियन्सने Arjun Tendulkar ला आपल्या ताफ्यात घेतलं, आकाश चोप्राने सांगितलं कारण
….म्हणून मुंबई इंडियन्सने Arjun Tendulkar ला आपल्या ताफ्यात घेतलं, आकाश चोप्राने सांगितलं कारण

“अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबईच्या टीमसोबत राहून बरेच काही शिकू शकतो. सचिन....

Read more