ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

….म्हणून मुंबई इंडियन्सने Arjun Tendulkar ला आपल्या ताफ्यात घेतलं, आकाश चोप्राने सांगितलं कारण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 20, 2021 11:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

….म्हणून मुंबई इंडियन्सने Arjun Tendulkar ला आपल्या ताफ्यात घेतलं, आकाश चोप्राने सांगितलं कारण

शहर : मुंबई

“अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबईच्या टीमसोबत राहून बरेच काही शिकू शकतो. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे त्याचे वडिल आहेत. सचिन क्रिकेटचं विद्यापीठ आहे. अर्जुनला आपल्या वडीलांकडून खूप काही शिकता येऊ शकतं. अर्जुन आता सर्वात यशस्वी फ्रँचायजीशी जोडला गेला आहे. मुंबईच्या गोटात अर्जुनला क्रिकेटबाबतीत सर्व छक्के पंजे शिकता येतील. अर्जुनने मुंबईसाठी विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुन फक्त त्याच्या आडनावामुळे इथवर पोहचलेला नाही. तो काही न काही करत असतो. मुंबईला अर्जुन हवा होता, त्यामुळे मुंबई फ्रँचायजीने खरेदी केलं आहे, असं टीम इंडियाचा माजी खेळाडू राहिलेला आकाश चोप्रा म्हणाला आहे. (ipl auction 2021 team india former player aakash chopra on arjun tendulkar)

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) हा या लिलावातील आकर्षणाचा मुद्दा ठरला. अर्जुनला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याच्या 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं. दरम्यान यानंतर अर्जुनवर सोशल मीडियावरुन घराणेशाहीच्या मुद्यावरुन जोरदार टीका करण्यात येत आहे.

सारा तेंडुलकरकडून कौतुक

अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) अर्जुनचं कौतुक केलं आहे. साराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन अर्जुनचं कौतुक केलं आहे. अर्जुनला मुंबई इंडियन्सने ताफ्यात सामावून घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन अर्जुनच्या स्वागताची एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. तीच पोस्ट साराने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. सोबत साराने म्हटलं आहे की, ‘ही संधी तुझ्याकडून कोणीच हिरावू शकणार नाही.

मुंबईने आपल्या गोटात लिलावातून एकूण 7 खेळाडू घेतले. त्यापैकी न्यूझीलंड 2, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी 1 आणि भारताचे 3 खेळाडू आहेत. यामध्ये सचिन तेडुंलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे. मुंबईने अर्जुनला त्याच्या 20 लाख या बेस प्राईजवर खरेदी केलं.

मुंबईने लिलावातून आपल्या ताफ्यात घेतलेले खेळाडू

अॅडम मिल्न (न्यूझीलंड) 3.20 कोटी रुपये.

न्यूजीलंडचा वेगवान गोलंजदाज अॅडन मिल्न हा 14 व्या मोसमात मुंबईच्या ताफ्यात येणारा पहिला खेळाडू ठरला. मिल्नची बेस प्राइस 50 लाख इतकी होती. पण मुंबईने त्याच्यासाठी 3 कोटी 20 लाख रुपये मोजले.

नॅथन कुल्टर नाइल (ऑस्ट्रेलिया), 5 कोटी रुपये.

पीयूष चावला (भारत), 2.2 कोटी रुपये.

युद्धवीर चरक (भारत), 20 लाख रुपये.

मार्को जॅनसन (दक्षिण आफ्रिका), 20 लाख रुपये.

अर्जुन तेंडुलकर ( भारत), 20 लाख रुपये.

जेमी निशाम (न्यूजीलंड), 50 लाख रुपये.

मागे

IPL 2021| ख्रिस मॉरिसला सर्वात मोठी रक्कम, एकूण 57 खेळाडूंचा लिलाव
IPL 2021| ख्रिस मॉरिसला सर्वात मोठी रक्कम, एकूण 57 खेळाडूंचा लिलाव

गुरुवारी चेन्नई येथे जाहीर झालेल्या खेळाडूंच्या लिलावात इंडियन प्रीमियर ....

अधिक वाचा

पुढे  

अवघ्या 16 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू, त्याच्या 428 धावांच्या जोरावर संघाचा 951 धावांचा पर्
अवघ्या 16 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू, त्याच्या 428 धावांच्या जोरावर संघाचा 951 धावांचा पर्

वय केवळ 16 वर्ष 221 दिवस इतकं असताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण, प्रथम श्रेणी क....

Read more