ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हैदराबादची चांगली सुरूवात 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 08:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हैदराबादची चांगली सुरूवात 

शहर : viswanatham

काही काळ गुणतालिकेत टॉपवर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सने शेवटच्या लीग सामन्यात केकेआरवर विजय मिळवल्यामुळे तिसर्‍या स्थानावर घसरावे लागले. त्यामुळे ‘प्ले ऑफ’मध्ये एलिमिनेटर सामना खेळावा लागत असून, या सामन्यात त्यांना ‘लक बाय चान्स’ने ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचलेल्या सनरायझर्सविरुद्ध बुधवारी लढावे लागणार आहे. ‘क्वालिफायर-2’ मध्ये पोहोचण्यासाठी या दोन्ही संघांना ही एकच संधी असणार आहे. त्यामुळे हरेल तो घरी जाईल.
केन विल्यम्सन नाणेफेकीच्या बाबतीत पुन्हा अनलकी ठरला. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या हंगामात दिल्लीने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना आयपीएलमधील एक अपयशी संघ हा डाग पुसायची चांगली संधी आहे. याआधी दिल्ली 2008 ला राजस्थानकडून सेमीफायनलमध्ये हरली होती. तसेच 2009 लाही तेव्हाच्या डेक्कनने दिल्लाचा सेमीफायनलमध्ये पराभव केला होता. प्ले ऑफ सिस्टम आल्यानंतर 2012 दिल्लीने दोन्ही क्वालीफायर सामने गमावले होते.  

 

मागे

सामना रंगतदार होणार- श्रेयस अय्यर
सामना रंगतदार होणार- श्रेयस अय्यर

विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून आयपीएलमधील विदेशी ख....

अधिक वाचा

पुढे  

दिल्लीचा हैदराबादवर रोमहर्षक विजय
दिल्लीचा हैदराबादवर रोमहर्षक विजय

163 धावांचा पाठलाग करणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने 8 गडी राखून विजयी लक्ष्य ओलां....

Read more