ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नेमबाजी विश्वचषकात राही सरनोबतला सुवर्ण पदक, ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 12:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नेमबाजी विश्वचषकात राही सरनोबतला सुवर्ण पदक, ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं

शहर : कोल्हापूर

कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत पुन्हा एकदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. जर्मनीमध्ये झालेल्या नेमबाज विश्वचषक स्पर्धेत तिनं २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदाकाला गवसणी घातली आणि २०२० रियो ऑलिम्पिकसाठीचं तिकीट निश्चित केलं. राहीनं यापूर्वी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर रियो ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे तिची संधी हुकली होती. राहीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला अनेक पदकांची कमाई केली आहे.त्याआधी आज सौरभ चतुर्वेदी या १७ वर्षांच्या युवकाने १० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक मिळवून दिलं. सौरभ चतुर्वेदीने २४६. पॉईंट्सचा स्कोअर करून स्वत:चंच २४५ पॉईंट्सचं रेकॉर्ड मोडलं. सौरभ चौधरीने यावर्षाच्या सुरुवातीला दिल्लीमध्ये झालेल्या विश्वचषकातही सुवर्ण पदकाची कमाई केली होती. २०१८ सालच्या युथ ऑलिम्पिकमध्ये आणि २०१८ सालच्या आशियाई स्पर्धेतही चौधरीने सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. रविवारी अपुर्वी चंडेलानेही सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

 

मागे

दुसऱ्या सराव सामन्यात केएल राहुल आणि धोनीचं बांगलादेश विरोधात दमदार शतक
दुसऱ्या सराव सामन्यात केएल राहुल आणि धोनीचं बांगलादेश विरोधात दमदार शतक

दुसऱ्या सराव सामन्यात धोनी आणि केएल राहुलने धमाकेदार शतक ठोकलं आहे. या दोनह....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019 : वर्ल्ड कपची ओपनिंग सेरेमनी थोड्याच वेळात
World Cup 2019 : वर्ल्ड कपची ओपनिंग सेरेमनी थोड्याच वेळात

वर्ल्ड कप स्पर्धेला २४ तासांपेक्षा कमी तासाचा अवधी शिल्लक आहे. उद्या म्हणज....

Read more