ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

World Cup 2019 : वर्ल्ड कपची ओपनिंग सेरेमनी थोड्याच वेळात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 08:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

World Cup 2019 : वर्ल्ड कपची ओपनिंग सेरेमनी थोड्याच वेळात

शहर : मुंबई

वर्ल्ड कप स्पर्धेला २४ तासांपेक्षा कमी तासाचा अवधी शिल्लक आहे. उद्या म्हणजेच गुरुवारपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधी आज थोड्याच वेळात ओपनिंग सेरेमनीला सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता ओपनिंग सेरेमनीचा भव्य कार्यक्रम रंगेल. लंडनच्या प्रसिद्ध बकिंगहम पॅलेसजवळील लंडन मॉलमध्ये हा कार्यक्रम होईल.

या भव्य दिव्य कार्यक्रमाला इंग्लंडचा राजघराण्यातील सदस्य उपस्थित असणार आहेत. हा सर्व कार्यक्रम स्टार स्पोर्ट्स आणि अन्य स्पोर्ट्स चॅनेलवरुन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जवळपास ४ हजार पेक्षा अधिक चाहते उपस्थित असतील. या चाहत्यांची निवड बॅलेट पेपरनुसार करण्यात आली आहे.

वर्ल्डकपमधील पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळण्यात येणार आहे.  हा सामना उद्या (३० मे) ला दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे.   टीम इंडीयाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना ५ जून रोजी होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे.

मागे

नेमबाजी विश्वचषकात राही सरनोबतला सुवर्ण पदक, ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं
नेमबाजी विश्वचषकात राही सरनोबतला सुवर्ण पदक, ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं

कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत पुन्हा एकदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. जर....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019 : क्रिकेट विश्वचषकापूर्वी कर्णधारांची 'विराट' फौज राणीच्या भेटीला
World Cup 2019 : क्रिकेट विश्वचषकापूर्वी कर्णधारांची 'विराट' फौज राणीच्या भेटीला

क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व दहा स्पर्धक राष्ट्रांच्या ....

Read more