ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रविंद्र जाडेजाणे संजय मांजरेकरला सुनावले

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 02:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रविंद्र जाडेजाणे संजय मांजरेकरला सुनावले

शहर : मुंबई

"मी तुमच्यापेक्षा दुपट सामने खेळलो आहे., अजूनही खेळतो आहे. ज्यांनी काही कमावले आहे, अशा लोकांचा आदर करायला शिका , मी तुमच्या 'वर्बल डायरिया ' बाबत खूप ऐकल आहे. " अशा शब्दात अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जाडेजा ने माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकरला सुनावले.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, 30 जुन रोजी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताचा 31 धावांनी पराभव झाला . त्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात रविंद्र जाडेजाच्या समावेशाचे संकेत दिले होते. जाडेजा या विश्वचषकात एकही सामना खेळलेला नाही पण बदली खेळाडू म्हणून त्याने चांगले क्षेत्ररक्षण केले आहे. परंतु जाडेजाच्या संघात सामील होण्याच्या वृतावर संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, "तुकड्यांमद्धे परफॉर्मेंस करणार्‍या खेळाडूना प्लेईंग इलेवण मध्ये पाहू शकत नाही. तुकड्या तुकड्यामद्धे परफॉर्मेंस करणारे खेळाडू मला आवडत नाहीत. जसा की सध्या रविंद्र जाडेजाचा वंनडेतील परफॉर्मेंस. मला एक तर गोलंदाज आवडेल किंवा फलंदाज." या प्रतिक्र्येबदल संतापलेल्या जाडेजाने समालोचक संजय मांजरेकर ला चांगलेच सुनावले.

रविंद्र जाडेजा ने 151 वंनडे सामन्यात 2035 धावा केला असून 174 विकेट्स घेतल्या आहेत. तर संजय मांजरेकर यांनी 74 वन डे सामन्यात 1994 धावा केल्या असून 1 विकेट घेतली आहे.

मागे

वर्ल्ड कप २०१९  : ...तरच पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये प्रवेश
वर्ल्ड कप २०१९ : ...तरच पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये प्रवेश

वर्ल्ड कपच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा ११९....

अधिक वाचा

पुढे  

पाकिस्तानने  टॉस जिंकला. 7 ओवर मधेच पहिला विकेट
पाकिस्तानने टॉस जिंकला. 7 ओवर मधेच पहिला विकेट

विश्वचषक  स्पर्धेतील आजच्या लढतीत पाकिस्तान व बांग्लादेश मध्ये सामना सु....

Read more