ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वर्ल्ड कप २०१९ : ...तरच पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये प्रवेश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 04, 2019 12:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वर्ल्ड कप २०१९  : ...तरच पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये प्रवेश

शहर : मुंबई

वर्ल्ड कपच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा ११९ रनने पराभव केला आहे. याचबरोबर इंग्लंडच्या टीमने सेमी फायनल गाठली आहे. तर न्यूझीलंडचाही सेमी फायनलचा प्रवेश निश्चित झाला आहे. तर पाकिस्तानला मात्र मोठा धक्का बसला आहे. सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आता पाकिस्तानला अशक्य अशी गोष्ट करावी लागणार आहे.

सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करावी लागेल. या मॅचमध्ये पाकिस्तानची पहिले बॉलिंग आली तर ते सेमी फायनलमध्ये प्रवेश करु शकणार नाहीत.

बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानने पहिले बॅटिंग करून ४०० रन केले तर त्यांना बांगलादेशला ८४ रनवर ऑल आऊट करून ३१६ रननी हरवावं लागेल. ३५० रन केले तर बांगलादेशला ३८ रनवर ऑल आऊट करून ३१२ रननी सामना जिंकावा लागेल. ४५० रन केले तर बांगलादेशचा ३२१ रननी पराभव करावा लागेल. हे गणित बघता पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचणार नाही, असंच म्हणावं लागेल.

पाकिस्तानचा सेमी फायनल प्रवेश अशक्य झाल्यामुळे आता सेमी फायनलचं गणित समोर आलं आहे. पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम ११ पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आणि इंग्लंडची टीम १२ पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर राहणार आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात स्पर्धा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला तर ते पहिल्या क्रमांकावर राहतील. पण जर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि भारताने श्रीलंकेचा पराभव केला तर मात्र भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचेल.

सेमी फायनलमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारी टीम चौथ्या क्रमांकाच्या टीमशी आणि दुसऱ्या क्रमांकाची टीम तिसऱ्या क्रमांकाच्या टीमशी खेळेल. भारत पहिल्या क्रमांकावर राहिला तर सेमी फायनलमध्ये त्यांचा सामना न्यूझीलंडशी तर दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर इंग्लंडशी होईल. 

 

मागे

'अंबाती रायुडूच्या निवृत्तीला निवड समिती जबाबदार' - गंभीर
'अंबाती रायुडूच्या निवृत्तीला निवड समिती जबाबदार' - गंभीर

भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच....

अधिक वाचा

पुढे  

रविंद्र जाडेजाणे संजय मांजरेकरला सुनावले
रविंद्र जाडेजाणे संजय मांजरेकरला सुनावले

"मी तुमच्यापेक्षा दुपट सामने खेळलो आहे., अजूनही खेळतो आहे. ज्यांनी काही कमा....

Read more