ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज, मुंबईत युवा क्रिकेटपटूचा गळफास

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2020 11:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज, मुंबईत युवा क्रिकेटपटूचा गळफास

शहर : मुंबई

आयपीएलमध्ये सिलेक्शन झाल्याने नाराज झालेल्या मुंबईतील युवा क्रिकेटपटूने टोकाचे पाऊल उचलले. 27 वर्षीय करण तिवारीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

कुरार पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, करण तिवारी मालाड पूर्व भागातील जानू कंपाऊंडमध्ये इमारतीत आई आणि भावासोबत राहत होता. स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळणारा करण आयपीएलसाठी तयारीही करत होता.

आयपीएलसाठी संघाची निवड झाल्याची माहिती त्याला मिळाली, मात्र आपलं सिलेक्शन झाल्याने तो काहीसा नाराज असल्याचे म्हटले जाते. त्याने दहा ऑगस्टला रात्री 10.30 वाजता राजस्थानमध्ये राहणाऱ्या आपल्या मित्राला कॉल केला. सिलेक्शन झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याची माहिती त्याने मित्राला दिली.

घाबरलेल्या मित्राने राजस्थानमध्ये असलेल्या करणच्या बहिणीला फोन केला, तिने आपल्या आईला तातडीने फोन केला. मात्र त्याचे कुटुंबीय त्याच्या खोलीत पोहोचून दरवाजा तोडेपर्यंत करणने गळफास घेतला होता, अशी माहिती आहे. घरातील चादरीने पंख्याला दोर लटकावून करणने आत्महत्या केली.

करणच्या कुटुंबाने कुरार पुलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. करण तिवारी क्रिकेट खेळण्यात माहीर होता. त्याला कुठल्याही किंमतीवर आयपीएलमध्ये खेळायचे होते, असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

 

मागे

भारताच्या हॉकी कर्णधारासह चौघांना कोरोनाची लागण
भारताच्या हॉकी कर्णधारासह चौघांना कोरोनाची लागण

भारताचा हॉकी कर्णघार मनप्रीत सिंग याच्यासह राष्ट्रीय शिबिरासाठी दाखल झाल....

अधिक वाचा

पुढे  

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात 'आदित्य ठाकरे'!
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात 'आदित्य ठाकरे'!

यंदाचे ‘आयपीएल’ यूएईमध्ये खेळवले जाणार असल्याची घोषणा झाल्यानंतर कोणत....

Read more