ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डेविस कप : तब्बल 55 वर्षानंतर भारतीय खेळाडू करणार पाकिस्तान दौरा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 05, 2019 05:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डेविस कप : तब्बल 55 वर्षानंतर भारतीय खेळाडू करणार पाकिस्तान दौरा

शहर : मुंबई

भारत-पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये राजकिय संबंध ताणलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशात नेहमीच तणावाचे वातावरण असते. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2012 वर्षानंतर एकही द्विदेशीय मालिका झालेली नाही. शिवाय पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्यासाठी व्हिसाही अनेकदा नाकारल्याच्या घटना आहेत. पण, आता तब्बल 55 वर्षांनी भारताचा टेनिस संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.

भारतीय टेनिस संघ पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये जाऊन डेविस कप खेळणार आहे. पाकिस्तान आणि भारत संघाचा सामना 1964 साली लाहोरमध्ये झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 4- 0 फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर 2006मध्ये दोन्ही देशांचा टेनिस सामना मुंबईत झाला होता. या सामन्यात देखील भारताने पाकिस्तानला 3- 2ने पराभूत केले होते. यामुळे 13 वर्षानंतर डेविस कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगणार आहे.

यावर पाकिस्तानचा दिग्गज टेनिसपटू अकिल खानने मान्य केले आहे की, भारताने टेनिस खेळामध्ये पाकिस्तानच्या तुलनेने खूप प्रगती केली आहे. त्यामुळे भारतासमोर विजय मिळवणे कठीण असणार आहे, पण अशक्य नाही. परंतू इस्लामाबाद येथे होणाऱ्या डेविस कपमध्ये आम्ही भारताला नमवून विजय मिळवू शकतो असा विश्वास त्याने व्यक्त केला.

त्याचप्रमाणे भारत- पाकिस्तान टेनिस संघात सामना होत असल्याचा आनंद आहे. तसेच पाकिस्तानात या सामन्याची खूप उत्सुकता लागली आहे. या दौऱ्यामध्ये भारताचा संघ पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पाकिस्तानच्या टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष सलीम सैफुल्लाह खान यांनी सांगितले.  

मागे

प्रो कब्बडी 7 : आजचे सामने
प्रो कब्बडी 7 : आजचे सामने

आज प्रो कब्बडी 7 मध्ये दोन सामने खेळले जातील . पहिला सामना हरियाणा स्टीलर्स आ....

अधिक वाचा

पुढे  

स्टीव्ह स्मिथ असाच खेळत राहिला, तर कोहली अव्वल स्थान गमावेल
स्टीव्ह स्मिथ असाच खेळत राहिला, तर कोहली अव्वल स्थान गमावेल

अ‍ॅशेस 2019 : एका वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या स्टीव्हन स्....

Read more