ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्टीव्ह स्मिथ असाच खेळत राहिला, तर कोहली अव्वल स्थान गमावेल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2019 04:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

स्टीव्ह स्मिथ असाच खेळत राहिला, तर कोहली अव्वल स्थान गमावेल

शहर : मुंबई

ॅशेस 2019 : एका वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या स्टीव्हन स्मिथन ॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचे धाबे दणाणुन सोडले. स्मिथनं दोन्ही डावांत शतकी खेळी करताना ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीत 251 धावांनी विजय मिळवून दिला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत कांगारुंनी 1-0 अशी आघाडी घेतली. स्मिथन पहिल्या डावात 144 आणि दुसऱ्या डावात 142 धावांची खेळी केली. स्मिथचे हे कसोटी क्रिकेटमधील 25वे शतक ठरले

दोन्ही डावांत मिळून 286 धावा करणाऱ्या स्मिथला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या कामगिरीच्या जोरावर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली. या सामन्यापूर्वी स्मिथच्या खात्यात 857 गुण जमा होते, परंतु सामन्यानंतर त्याची गुणसंख्या ही 903 झाली आहे. या कामगिरीसह त्यानं कसोटी फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली. केन विलियम्सन ( 913) आणि विराट कोहली ( 922) अनुक्रमे दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर आहेत. चेतेश्वर पुजाराची ( 881) चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. स्मिथनं एका सामन्यात तब्बल 46 गुणांची कमाई केली आहे आणि मालिकेतील चार सामने अजून शिल्लक आहेत. त्याचा हा फॉर्म असाच कायम राहिल्यास तो कसोटीत अव्वल स्थान पटकावू शकतो.

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावून स्मिथने कसोटी क्रिकेटमधील 25वे शतक पूर्ण केले. त्यानं कोहली आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यांच्या 25 कसोटी शतकांशी बरोबरी केली. स्मिथनं 119 डावांत हा पल्ला गाठला आणि कोहलीला मागे टाकले. या विक्रमात सर डॉन ब्रॅडमन 68 डावांसह अव्वल स्थानावर आहेत. कोहली ( 127 डाव), सचिन तेंडुलकर ( 130 डाव ) आणि सुनील गावस्कर ( 138 डाव) हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या पाचव्या स्थानावर आहेत.

ॅशेस मालिकेतील स्मिथचे हे दहावे शतक ठरले. या कामगिरीसह स्मिथनं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. ॅशेस मालिकेत सर्वाधिक शतकांचा पुरस्कार सर डॉन ब्रॅडमन ( 19) आणि जॅक हॉब्स ( 12) हे आघाडीवर आहेत. याशिवाय इंग्लंडमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक शतकं करणाऱ्या ब्रॅडमन, वॉ, ॅलन बॉर्डर आणि मार्क टेलर यांच्या पंक्तीत स्थान पटकावले आहे.

 

 

मागे

डेविस कप : तब्बल 55 वर्षानंतर भारतीय खेळाडू करणार पाकिस्तान दौरा
डेविस कप : तब्बल 55 वर्षानंतर भारतीय खेळाडू करणार पाकिस्तान दौरा

भारत-पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये राजकिय संबंध ताणलेले आहेत. त्याम....

अधिक वाचा

पुढे  

India vs West Indies : टीम इंडियात दिसतील चार बदल; कोण IN, कोण OUT?
India vs West Indies : टीम इंडियात दिसतील चार बदल; कोण IN, कोण OUT?

भारतीय संघाने तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आह....

Read more