ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Rahul dravid च्या मुलासोबत क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने ठोकल्या 404 धावा, मुंबईच्या गोलंदाजांना धुतलं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 16, 2024 11:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Rahul dravid च्या मुलासोबत क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने ठोकल्या 404 धावा, मुंबईच्या गोलंदाजांना धुतलं

शहर : मुंबई

राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडच्या फलंदाजीबद्दल तुम्ही ऐकल असेल. यावेळी समित द्रविडसोबत खेळणाऱ्या मुलाने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने मैदानात धावांचा पाऊस पाडला. पण त्याचवेळी राहुल द्रविड यांचा मुलगा समितने या मॅचमध्ये किती धावा केल्या?

असं म्हणतात, जसा बाप, तसा मुलगा. राहुल द्रविड यांची दोन्ही मुलं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहेत. पण या मुलांसोबत क्रिकेट खेळणारी मुलं सुद्धा मागे नाहीयत. ते सुद्धा तितकेच माहिर खेळाडू आहेत. राहुल द्रविड यांचा मोठा मुलगा समित द्रविड सोबत क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने मोठी कामगिरी केली आहे. मुंबई विरुद्ध कूच बेहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये या मुलाने जबरदस्त प्रदर्शन केलय. समित द्रविडसोबत क्रिकेट खेळणाऱ्या प्रखर चतुर्वेदीने कूच बेहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये इतिहास रचला. त्याने एकट्याने 400 पेक्षा जास्त धावा केल्या. या टुर्नामेंटच्या इतिहासात आतापर्यंतच्या फायनल मॅचमध्ये 400 प्लस धावा करणारा प्रखर चतुर्वेदी पहिला फलंदाज आहे. त्याने कर्नाटककडून खेळताना मुंबई विरुद्ध हा महारेकॉर्ड केला.

प्रखर चतुर्वेदीने 638 चेंडूचा सामना करताना 404 धावा ठोकल्या. त्याने 49 वेळा चेंडू सीमारेषेपार पाठवला. यात 46 बाऊंड्री आणि तीन सिक्स आहेत. प्रखर चतुर्वेदीने कर्नाटकडून ओपनिंग करताना ही इनिंग खेळली. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. प्रखरने ज्या मॅचमध्ये एकट्याने नाबाद 404 धावा केल्या. त्या मॅचमध्ये राहुल द्रविडच्या मुलाने समितने 46 चेंडूत 22 धावा केल्या. 10 व्या नंबरवर फलंदाजी करणाऱ्या समर्थने 135 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. त्याशिवाय मधल्याफळीत हर्षल धरमानीने शानदार शतक झळकवत 169 धावा केल्या.

कर्नाटकच्या 890 धावा

या फलंदाजीमुळे मोठ्या आघाडीसह कर्नाटक-मुंबई सामना ड्रॉ झाला. मुंबईने आपल्या पहिल्या डावात 380 धावा केल्या होत्याय. तेच कर्नाटकटने 8 विकेट गमावून 890 धावा केल्या. KSCA स्टेडियममध्ये हा फायनल सामना खेळला गेला.

मागे

T20 World Cup 2024 आधी बीसीसीआयचा मोठा निर्णय
T20 World Cup 2024 आधी बीसीसीआयचा मोठा निर्णय

बीसीसीआय आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी तयारीला लागली आहे. वर्ल्ड कपला काही महि....

अधिक वाचा

पुढे  

 अफगाणिस्तानला क्लिन स्वीप देण्यासाठी तयार, टीम इंडियात 3 बदल!
अफगाणिस्तानला क्लिन स्वीप देण्यासाठी तयार, टीम इंडियात 3 बदल!

टीम इंडियाचा डोळा हा अफगाणिस्तान विरुद्ध मालिका 3-0 ने जिंकण्याकडे असणार आहे....

Read more