ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 12, 2021 12:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!

शहर : मुंबई

धन प्राप्तिसाठी, हनुमानाच्या कृपा प्राप्तिसाठी, शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठीपिंपळाच्या झाडाला अतिशय पवित्र मानले जाते. असे म्हणतात की, ज्याच्या घरी पिंपळाचे झाड असेल त्या घराला दारिद्र येत नाही आणि सुख-शांती तेथे वास करते. विज्ञानाने देखील पिंपळवृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. आज आपण पहाणार आहोत पिपळवृक्षासंबंधीचे उपाय, ज्यातून अनेक समस्यांचे निदान केले जाऊ शकतात.

उपाय

शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी

शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठीही पिंपळवृक्षाची पूजा करणे फायद्याचे सांगितले गेले आहे. नियमाने पिपंळाच्या वृक्षाला जलाभिषेक केल्याने शनि दोषापासून मुक्ती मिळते, याने शनिदेवाची शांती होते. शनिवार संध्याकाळी पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावावा.

धन प्राप्तिसाठी

पिंपळाच्या वृक्षाखाली शिव शंकराची प्रतिमा स्थापन करुन त्यावर दररोज जलाभिषेक करावा. नियमित पूजा करावी आणि ऊँ नमः शिवाय हा मंत्र जाप किमान ५ वेळा किंवा ११ वेळा करावा. त्यानंतर तुम्हाला स्वतःलाच त्याचा अनुभव येईल.

हनुमानाच्या कृपा प्राप्तिसाठी

हनुमानाची तुमच्यावर कृपा व्हावी असे वाटत असेल तर पिंपळवृक्षाची पुजा करावी. पिंपळाच्या वृक्षाखाली बसून हनुमानाची पूजा करावी त्यामुळे रामभक्त हनुमान प्रसन्न होतात अशी धारणा आहे. तसेच साधकाची मनोकामना पूर्ण होते.

मागे

Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या
Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या

माघ हा एक भारतीय राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षातील अकरावा महिना आहे. पौष महि....

अधिक वाचा

पुढे  

माघी गणेश जयंती : राज्यात भाविकांचा उत्साह; जाणून घ्या शुभ मुहूर्त
माघी गणेश जयंती : राज्यात भाविकांचा उत्साह; जाणून घ्या शुभ मुहूर्त

आज गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti 2021) , त्यानिमित्ताने गणरायाच्या मंदिरात भाविकांची मोठ....

Read more