ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चारशे होमेगार्ड बेरोजगार: दोन महिन्यांपासून रोजगार थकबाकी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 06:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चारशे होमेगार्ड बेरोजगार: दोन महिन्यांपासून रोजगार थकबाकी

शहर : वर्धा

        वर्धा - पोलिस यंत्रणेत कठीण प्रसंगात लोकांना सेवा पुरवणा-या होमगार्ड्वर बेरोजगारीची वेळ आली आहे. निधि उपलब्ध नसल्याचे कारण सांगत जवळपास ४०० होमगार्ड्वर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना आता दुसरा रोजगार शोधावा लागणार आहे. त्याचबरोबर, पोलिसांच्या कामाचा व्याप ही वाढण्याची शक्यता आहे. 


        जनतेच्या चोवीस तास सेवेसाठी, आपत्ती, व्यवस्थापन वेळीही ते मदतीला धावून येत असतात. परंतु आता निधी उपलब्ध नसल्याने त्यांना कार्यमुक्त केलं जाणार आहे. त्यांचे दोन महिन्यापासूनचे मानधनही थकीत आहे. अशीच परिस्थिति इतर जिल्ह्यातही असल्याची माहिती मिळाली आहे. 


       राज्यात सुमारे ४५ हजार होमेगार्ड् आहेत. दिल्ली, मुंबईसह मध्यप्रदेश इत्यादी राज्यांत किमान अकरा महिने रोजगार दिला जातो. परंतु महाराष्ट्रात मात्र बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. होमेगार्ड्ना पुन्हा कधी काम मिळणार याची शाश्वती नाही. तरी या होमेगार्ड्ना नियमीत रोजगार द्यावा आणि त्यांना पूर्ववत करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.                
 

मागे

रविवार असला तरी शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होणार
रविवार असला तरी शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होणार

          २६ जानेवारी! सगळ्यांकरताच हा शुभ दिन आनंदाची पर्वणी असते. प्रज....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईचे दर्शन ८०० फुटांवरून; ‘लंडन आय’सारखं ‘मुंबई आय’ साकारणार  
मुंबईचे दर्शन ८०० फुटांवरून; ‘लंडन आय’सारखं ‘मुंबई आय’ साकारणार  

     मुंबई - राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळ....

Read more