ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

साई जन्मभूमी वादात शिर्डी बंद

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 18, 2020 02:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

साई जन्मभूमी वादात शिर्डी बंद

शहर : नाशिक

         शिर्डी : साईबाबा यांच्या जन्मस्थळ असलेल्या पाथरी गावाचा विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करताच शिर्डीकर नाराज झाले आहेत. त्यामुळे शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसापासून शिर्डी शहरात प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका होत आहे, या बैठकीत सरकारवर दबाव आणण्याची रणनीती तयार केली जात आहे.  

      साईबाबा यांची मुख्य समाधी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीगावात आहे. शिर्डीमध्ये वर्षभरात अंदाजे तीन कोटीहून अधिक भाविक दर्शनाला येतात. त्यामुळे शिर्डीला अनेक सवलती दिल्या आहेत. खास करून शिर्डीमध्ये सर्वधर्म समभावाची शिकवण साईबाबांनी जगाला दिली आहे. साई बाबांच्या या शिकवणीला त्यांचे जन्मगाव जाहीर झाल्याने तडा जाणार असल्याचे म्हंटले जात आहे.  

      राज्याच्या सरकारने जन्मभूमी पाथरी गावाच्या विकासाची घोषणा केल्यानंतर शिर्डीचे महत्व कमी होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शिर्डीच्या लहान-मोठ्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आज शनिवारी ग्रामसभा घेऊन परीसरातील ग्रामपंचायतीने शिर्डी बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्याचे ठरविले आहे. या परिस्थितीचा आढावा घेत सर्व कार्यकर्ते, पक्षाचे नेतेमंडळी आणि साईभक्त एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे.             

मागे

मेगा भरती भाजपला भोवल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा 
मेगा भरती भाजपला भोवल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा 

         मुंबई - मेगा भरती भाजपला भोवल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ....

अधिक वाचा

पुढे  

मंत्रालयात पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी
मंत्रालयात पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी

      मुंबई -  ५० मिमी जाडीच्या पिशव्यांनाही बंदी घालण्यात आली. मात्र  ....

Read more