ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता थेट ‘आकाशवाणी’वरुन इंग्रजीचे धडे!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 16, 2021 11:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता थेट ‘आकाशवाणी’वरुन इंग्रजीचे धडे!

शहर : पुणे

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा शालेय विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शाळा सुरु नसल्यानं विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठ्या अडचणी येत आहेत. शाळेसह ट्यूशन क्लासेसही बंद आहेत. या विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता आकाशवाणीवरुन इंग्रजीचे धडे दिले जाणार आहेत.

इंग्रजी हा ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना जड जाणारा विषय. त्यात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळा बंद. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीची भीती अजूनच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही भीती दूर करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे देण्यासाठी आता थेट आकाशवाणीचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ‘आम्ही इंग्रजी शिकतो या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

आकाशवाणीवरील इंग्रजीचे धडे कधीपासून?

येत्या 19 जानेवारी ते 26 मार्च 2021 दरम्यान इयत्ता 4 थी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना 84 धडे शिकवण्यात येणार आहेत. 26 जानेवारी, 19 फेब्रुवारी आणि 11 मार्च हे तीन दिवस वगळून सोमवार ते शनिवार ठराविक वेळेत आकाशवाणीवरुन इंग्रजी विषयाचे धडे दिले जाणार आहेत. सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस या संस्थेकडून हे धडे गिरवले जाणार आहेत. बाकी 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरु करण्यात आल्यामुळे त्यांच्यासाठी आकाशवाणीचा वापर केला जाणार नाही.

पुणे महापालिकेचाही स्तुत्य उपक्रम

व्यसनाच्या जोखडात अडकून पडलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी आता पुणे महानगरपालिकेनं पुढाकार घेतला आहे. व्यसनाचा विळखा सोडवण्यासाठी धडपडत असलेले आपले कर्मचारी आणि सेवकांना व्यसनमुक्ती केंद्रात येणारा खर्च महापालिकेकडून उचलला जाणार आहे. महापालिकेच्या आरोग्य योजनेद्वारे हा खर्च केला जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

विशेष बाब म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांसाठी पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगारी रजाही दिली जाणार आहे. त्याचबरोबर व्यसनमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार केला जाणार असल्याची माहितीही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

 

मागे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ, राज्यात पहिल्या दिवशी 28,500 कोरोनायोद्ध्यांना लस
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ, राज्यात पहिल्या दिवशी 28,500 कोरोनायोद्ध्यांना लस

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळ....

अधिक वाचा

पुढे  

 भारताची लसीकरण मोहीम म्हणजे प्राणाची आहुती दिलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली- पंतप्रधान मोदी
भारताची लसीकरण मोहीम म्हणजे प्राणाची आहुती दिलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली- पंतप्रधान मोदी

कोरोना महामारीपासून सर्व देशवासियांना दिलासा देणाऱ्या आणि जगातील सर्वात ....

Read more