ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकसभा निवडणूक 2019,मतदान कसं करतात?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 19, 2019 03:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकसभा निवडणूक 2019,मतदान कसं करतात?

शहर : मुंबई

देशात सध्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. पण मतदान कसं केलं जातं, त्याची नेमकी प्रक्रिया कशी असते हे जाणून घ्या.सगळ्यांत आधी, तुमचं वय काय आहे? मतदानासाठी तुमचं वय किमान 18 वर्षं पूर्ण असलं पाहिजे. मतदार म्हणून तुमची नोंदणी झाली की त्यानंतर तुम्ही मतदान केंद्रात जाऊ शकता.मतदान केंद्रात गेलात की तुम्हाला लहान-लहान गटांमध्ये आत सोडलं जाईल.तुमचा नंबर आला की मतदान अधिकारी तुमचे मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुक या कागदपत्रांच्या आधारे तुमची ओळख तपासून पाहील.त्यानंतर दुसरा एक अधिकारी तुमच्या बोटावर लगेच पुसली जाणारी शाई लावेल.त्यानंतर मतदारांच्या रजिस्टरमध्ये तुम्हाला सही करावी लागेल. यानंतर दुसरे मतदान अधिकारी तुम्हाला स्वाक्षरी केलेली मतदार स्लीप देतील.त्यानंतर तिसरा मतदान अधिकारी तुमची मतदार स्लीप घेऊन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच EVMच्या कंट्रोल युनिटवरील 'बॅलट' बटण दाबेल.आता तुम्ही मतदान करायला तयार आहात.तुम्हाला प्रत्यक्ष मतदान करण्यासाठीच्या कप्प्याकडे जायला सांगतील. तिथं तुम्हाला मतदान ईव्हीएमचे बॅलेटिंग युनिट दिसेल, यावर तुमचे मत नोंदवले जाईल.अरे हो, पण थांबा! हे इलेक्ट्रोनिक व्होटिंग मशीन म्हणजे आहे तरी काय?या मशीनवर उमेदवारांची नावं आणि त्यापुढे त्यांचं निवडणूक चिन्ह असतं. तिथेच एक बटण असतं.उमेदवारांची नावं त्या मतदारसंघातली प्रचलित भाषा आणि लिप्यांमध्ये लिहिलेली असतात.अशिक्षित मतदारांना कळावं यासाठी प्रत्येक उमेदवारापुढे त्याचं निवडणूक चिन्हं असतं.आता ज्या उमेदवाराला मत द्यायचं असेल त्याच्या नावासमोरील निळं बटण दाबा.पण बटण काही वेळ तसंच दाबून ठेवा... अजून तुमचं मत नोंदवलं गेलेलं नसतं.ज्यावेळेस तुम्हाला एक बीप ऐकू येते आणि कंट्रोल युनिटमधला लाईट बंद होतो, तेव्हा तुमचं मत नोंदवलं जातं.तुम्ही यशस्वीरीत्या मतदान केलं आहे.मतदान अधिकाऱ्यांनी EVMवरील "Close" बटण दाबलं की मशीन पुढे नवीन मतं नोंदवणं थांबवेल.

मतदान यंत्राशी छेडछाड होऊ नये म्हणून ते जुन्या पद्धतीने म्हणजे मेणाने सील केलं जातं. त्यानंतर त्यावर निवडणूक आयोगाकडून आलेली एक सुरक्षा पट्टी लावून सीरियल नंबर लिहिला जातो. मतमोजणीच्या वेळीच ते उघडलं जातं.मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतमोजणी सुरू करण्यापूर्वी कर्मचारी आणि एजंट्स स्वतः प्रत्येक ईव्हीएम तपासणी करतात.ही सर्व प्रक्रिया 'रिटर्निंग अधिकाऱ्याच्या' निरीक्षणाखाली सुरू असते.मतदान यंत्राशी काहीही छेडछाड झालेली नाही, याची खात्री पटली की रिटर्निंग अधिकारी 'रिझल्ट' बटण दाबतो.कंट्रोल युनिटमध्ये दाखवलेल्या प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या सर्व मतांची बेरीज केली जाते.पूर्ण समाधान झाल्यावर ते निकालपत्रावर स्वाक्षरी करून निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करतात.त्यानंतर निवडणूक आयोग अंतिम निकाल त्यांच्या वेबसाईटवर रिअल टाईम प्रसिद्ध करतं.

महाराष्ट्रातल्या मतदानाच्या तारखा

महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणुका होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. 18 एप्रिलला दुसरा टप्पा आहे. महाराष्ट्रातले कोणते मतदारसंघ कोणत्या टप्प्यात आहेत हे जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा.आज महाराष्ट्रात 10 जागांवर मतदान होत आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या ठिकाणी मतदान होत आहे. या मतदारसंघाविषयी आणि नेत्यांविषयी जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी वाचा.भारतात सात टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, 3ऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, 4थ्या टप्प्यात 9 राज्यातील 71 मतदारसंघ, 5व्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, 6व्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि 7 व्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात मतदान होईल.

लोकसभा निवडणुकीचे निकाल केव्हा जाहीर होणार

23 मे रोजी मतमोजणी होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी पूर्ण होऊन निकाल लागतील.

मतदार यादीत नाव कसं शोधाल?

निवडणुकीच्या काळात सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक असतो तो म्हणजे मतदार.

मागे

काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केला शिवसेनेत प्रवेश ...
काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केला शिवसेनेत प्रवेश ...

काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आह....

अधिक वाचा

पुढे  

पहिले अवयव दान केलेल्या  युवकाच्या  आईने  मतदानावर बहिष्कार टाकत  केले उपोषण
पहिले अवयव दान केलेल्या युवकाच्या आईने मतदानावर बहिष्कार टाकत केले उपोषण

लातूर जिल्ह्यामध्ये २०१७ च्या साली किरण लोभे या तरुणाचा मृत्यू झाला होता. य....

Read more