ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - नेल्सन मंडेला

पोस्ट :  जानेवारी 17, 2020 08:03 PM‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९९० मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते नेल्सन मंडेला यांची थोडक्यात माहिती.


        नेल्सन मंडेलांचा जन्म दि. १८ जुलै १९१८ ला दक्षिण आफ्रिकेतील ट्रांसकायीमधील अमटाटा गावातील एका टाम्बू कबिल्यातील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील हॅनरी नेल्सन एक सरळ साधे अशिक्षित व्यक्ती होते. इ. स. १९३० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी बालक नेल्सन बारा वर्षांचा होता.


        आता हा नेल्सन कबिल्याचे मुखिया डेविड यांच्याकडे आला. तेथेच त्याचे शिक्षण झाले. आफ्रिका विद्यापीठातून त्याने कला शाखेत बी. ए. ची डिग्री घेतली. लहानपणापासूनच राष्ट्रीयत्वाची भावना त्यांच्यात भरलेली होती. कबिल्याचा प्रमुख आपल्या मंत्र्यांच्या सल्ल्याने कायद्याचं राज्य कसं चालवतो हे त्याने जाणलं होतं. पूर्ण स्वातंत्र्य होतं. हिरवंगार जंगल, सेना, कायदा सगळं स्वत:चं होतं. या स्वातंत्र्याला राखण्यासाठी पूर्वजांनी दिलेला लढा त्यांना माहीत होता. गोरे विदेशी कसे शत्रू बनून राहिले आहेत हे नेल्सनला माहीत होते. १६ वर्षीय 'युवक' नेल्सन मंडेलाची सुन्नत कबिल्याच्या रिवाजानुसार वाशी नदीतटावर केली गेली. त्यांना कबिल्याच्या पंचायतीत सामील करून घेतले. नेल्सनच्या वयाच्या तेविसाच्या वर्षी कबिल्याचा मुखिया डेविडने त्याचे लग्न करायचे ठरविले. पण ती मुलगी पत्नी म्हणून नेल्सनला पसंत नव्हती. शेवटी तो आपला पुतण्या मितरायाला घरी जोहान्सबर्गला पळून गेला.


         जोहान्सबर्गला क्राउन कंपनीत कार्यालयात महिना दोन काउन कंपनीत त्याने नोकरी केली. नंतर प्रॉपर्टी डीलिंगच्या व कमिशनवर क्लार्कचे काम मिळाले. एक वर्षानंतर हुस्की अँड एडिलमॅन' नावाच्या एका अॅटर्नी फर्ममध्ये काम यांची फर्म होती. तेथेच नेल्सनला अनुभव आला की, गोरे पला अहंकार विसरू शकत नाहीत. जोहान्सबर्गमध्ये नेल्सनचा 'विटकिन, साइडल्स्की अँड ए मिळाले. ही गोऱ्यांची फर्म स्वप्नातसुद्धा आपला अहंकार विसरू शकत नाही. जोहान्सबर्गमध्ये नेल्सनचा परिचय सर्वप्रथम वॉल्टर सिसुलूंशी झाला होता.  


           इ. स. १९४४ मध्ये नेल्सन मंडे लीगची सर्वप्रथम वॉल्टर सिसुलूशी झाला होता. १९४४ मध्ये नेल्सन मंडेला आफ्रिकी राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झाले. सल, ऑलिवर टॉमबो, ऍटन लँबेदी व इतर उत्साही तरुणांबरोबर यूथ की स्थापना केली. त्यांचे उद्दिष्ट आफ्रिकनांचा विकास व स्वातंत्र्य हे होते. स. १९४३ मध्ये आफ्रिकी राष्ट्रीय काँग्रेसच्या संमेलनावेळी नेल्सन मंडेलाला युवा संघाचा महासचिव नियुक्त केले. इ. स. १९४८ मध्ये वर्णभेदाच्या पायावर आफ्रिकेत सरकार बनले. ही शासनप्रणाली तर गुलामीपेक्षाही भयंकर होती. पण वर्षभरातच नेल्सन व त्याच्या साथीदारांना सविनय कायदेभंगासारखे कार्यक्रम राबवून आफ्रिका राष्ट्रीय काँग्रेसला ताकदवान बनविले.


        इ. स. १९५० मध्ये मे दिनाच्या दिवशी १८ शांत प्रदर्शनकारींना पोलिसांनी गोळ्या घालून मारले. त्या वेळी आफ्रिकी राष्ट्रीय काँग्रेसने संपूर्ण देशात ‘काम बंद'ची घोषणा केली. २६ जून १९५० ला विरोध दिवस' मानला. वर्णभेदासारख्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या नियमांविरुद्ध विशेष चळवळ चालवली. यात भारतीयांनीही त्यांना सहकार्य दिले. यावेळी ८५०० जणांना अटक केली गेली. 


         इ. स. १९५२ मध्ये 'अवज्ञा अभियानात' भाग घेण्याच्या आरोपावरून नेल्सन मंडेलाला अटक करून मार्शल स्क्वायरला दिले. त्याच दरम्यान नेल्सनला आफ्रकी राष्ट्रीय काँग्रेसच्या ट्रांसवाल शाखेचा अध्यक्ष निवडले. नेल्सनची वाढती लोकप्रियता गोऱ्यांना खटकत होती. डिसेंबर १९५२ मध्ये नेल्सनने जोहान्सबर्गच्या तर न जाणे व कोणत्याही सार्वजनिक सभेत भाग न घेण्याचा नियम त्याला लावला. तेव्हा तिथेच नेल्सनने शोषित व पीडितांची वकिली सुरू करून व नीतीवर समूळ प्रहार केले.


        २६ जून १९५५ ला क्लिप टाउनमध्ये काँग्रेसबरोबर आफ्रिकेमधील सर्व जातीजमातीच्या सुमारे तीन हजार लोकांनी स्वातंत्र्याची मागणी करणारे पत्र तयार केले. त्याचा नेता नेल्सनच होता. ५ सप्टेंबर १९५६ ला सकाळीच १५६ कार्यकर्त्यांना त्यांच्या घरातूनच अटक केली. त्यात नेल्सन व त्याचे साथीदार लुटली, ऑलिवर, टॉमबो, वाल्टा सिसुलूसुद्धा होते. 'राजद्रोहाचा' खटला होता पण अपराध सिद्ध न झाल्यामुळे त्यांना सोडून दिले. आता नेल्सन मंडेलाचा विवाह ट्रांसकायीचे मंत्री कोलम्बस माडिकिजेलाची मुलगी नोम्जामो बैनी माडिकिजेलाबरोबर १९५८ मध्ये झाला. तीही नेल्सनच्याबरोबर लढ्यात नेहमीच होती.


         गोरे सरकार ३१ मे १९६१ ला गणतंत्र दिवस साजरा करण्याच्या तयारीत होते. तेव्हा नेल्सनने प्रधानमंत्री डॉ. फेयर फुटना पत्र लिहून निषेध नोंदविला व ही स्थिती बदलली नाही तर २९ मेला पूर्ण देशात आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला. गोऱ्या सरकारने अटकसत्र सुरू केले. मंडेला भूमिगत झाले. ७८ टक्के हरताळ यशस्वी झाला. जनतेत असंतोष धुमसत होता. १६ डिसेंबर १९६१ एकाच वेळी सर्व सरकारी ठिकाणांवर विध्वंसक कारवाई केली गेली. नेल्सन भूमिगत राहून आंदोलन चालवत होते. पोलीस त्यांना हातही लावू शकले नाहीत. इ. स. १९६२ मध्ये पॅन आफ्रिकी मंचावर अचानक प्रकट होऊन मंडेलांनी घोषणा दिली आणि तसेच अंतर्धान पावले. पोलीसं काहीच करू शकले नाहीत. भूमिगत राहूनच नेल्सननी लंडन व अल्जेरियाचा दौरा केला. तिथल्या पुढाऱ्यांना भेटले.

 
          ५ ऑगस्ट १९६२ ला परत देशात आले. त्याचवेळी कोणी गद्दाराने त्यांना पकडून दिले. मग इ. स. १९६१ मध्ये झालेल्या सर्वव्यापी हरताळासाठी जनतेला भडकावण्याच्या अपराधासाठी ५ वर्षांच्या कठोर कैदेची शिक्षा नेल्सनला दिली गेली. जून १९६४ मध्ये प्रिटोरिया जेलमधून लंडन विद्यापीठातून कायद्याची परीक्षा नेल्सननी दिली होती. त्यांना बंदी बनवून रॉवेन द्वीपला पाठविले. तिथे अती कष्टाची कामे व कमीत कमी अन्न अशा प्रकारे खूप वेदना त्यांना दिल्या गेल्या. पण तरीही त्यांनी हार मानली नाही.


      इ. स. १९७९ मध्ये नेल्सन मंडेलांना भारत सरकारद्वारा 'जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार' देऊन सन्मान केला. तेव्हा त्यांच्या पत्नाने भारतात येऊन तो पुरस्कार स्वीकारला. इ. स. १९८६ मध्ये स्वीडिश ट्रेड युनियन मादारे 'आंतरराष्ट्रीय शांती एवं स्वतंत्रता पुरस्कार' दिला गेला. नेल्सन मंडेला केवळ दक्षिण आफ्रिकेच्या मुक्ती संग्रामाचेच नाही तर संपूर्ण जगातील स्वातंत्र्य व दलितोद्धारप्रेमींचे श्रद्धेय बनले आहेत. ते स्वदेश, जातीचे प्रेम, संघर्ष, बलिदान इ. गुणांचे प्रतीक आहेत. एका सामान्य अशिक्षित कबिल्यात राहन स्वत:ची कर्मठता, दृढ संकल्प शक्ती, संघर्ष, स्वाभिमान, निर्भीडपणा व अदम्य साहस या गुणांनी दक्षिण आफ्रिकेच्या मुक्तीसंग्रामाचे जनक बनले व पुढे राष्ट्रपती झाले. हा जगातील मानवासाठी एक प्रेरणास्रोत आहे. त्यांची पत्नी विनीलाही १२ मे १९६९ रोजी अटक केली. नेल्सन मंडेलांनी २७ वर्षांच्या कैदेमध्ये क्रूर यातना सहन केल्या. पण कधीही हार मानली नाही. 


         शेवटी ११ फेब्रुवारी १९९० ला नेल्सन मंडेलांना गोऱ्या सरकारने कैदेतून मुक्त केले. १० मे १९९४ ला नेल्सन मंडेलांनी राष्ट्रपतीपद ग्रहण केले. इ. स. १९९० मध्ये २७ वर्षांच्या प्रदीर्घ कैदेतून सुटल्यावर जेव्हा नेल्सन मंडेला भारतात आले तेव्हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' त्यांना देऊन गौरविले. दि. ५ डिसेंबर २०१३ रोजी त्यांचे निधन झाले.