ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - विनोबा भावे

पोस्ट :  जानेवारी 13, 2020 08:08 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९८० मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते विनोबा भावे यांची थोडक्यात माहिती. 

 

     वडील श्री. नरहरी शंभूराव भावे व आई सौ. रुक्मिणी यांच्या पोटी एका धर्मनिष्ठ चित्पावन ब्राह्मण कुटुंबात आचार्य विनोबा भावे यांचा जन्म, दि. ११सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्रातील पेण जिल्ह्यातील घगोडे गावात झाला. वडील बडोदा राज्यात कपडा-तंत्रज्ञ होते. विनोबांचे पाळण्यातील नाव विनायक; पण विन्या, विनय, आचार्य विनोबा भावे, संत विनोबा भावे व 'बाबा' हीसुद्धा त्यांची प्रचलित नावे होती. तीन भाऊ व एक बहीण होती. आजोबा शंभूराव उदारमतवादी असून स्पृश्यास्पृश्यांना न मानणारे होते. ते शिवभक्त होते. हेच विचार सुरुवातीपासून विनोबांमध्ये होते. 

 

      विनोबांची आई अतिशय धार्मिक असून नेहमी संतवाणी गुणगुणत असे. तिच्याच सांगण्यावरून विनोबांनी इ. स. १९३०-३१ मध्ये संस्कृत गीतेचा मराठीमध्ये पद्यानुवाद केला. तो 'गीताई गीता माता' नावाने प्रसिद्ध आहे. त्यांच्या आईचे निधन १९१८ मध्ये झाले. विनोबांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. इ. स. १९१३ मध्ये वडिलांजवळ बडोद्याला राहन त्यांनी मॅट्रिक पास केले व इंटरमीडिएटला प्रवेश घेतला. त्यांना अत्यंत कुशाग्र बुद्धी होती, जबरदस्त स्मरणशक्ती हाता. बडोदा ग्रंथालयात जाऊन धार्मिक, साहित्यिक, ऐतिहासिक पुस्तके वाचण्याचा त्यांचा नित्यनेम होता; पण या अभ्यासाने त्यांचे समाधान होईना. त्यांना सगळी प्रमाणपत्रे जाळून टाकली आणि काशीला जाऊन संस्कृतच्या अभ्यासाला लागले.

 

      दि. ७ जून १९१६ रोजी गांधी व विनोबांची भेट झाली. इ. स. १९२० च्या शेवटी जमनालाल बजाज यांच्या उपस्थितीत नागपूरला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्या वेळी साबरमती आश्रमाप्रमाणे वर्धा येथे आश्रमाच्या स्थापनेची योजना तयार केली. ६ एप्रिल १९२१ पासून विनोबा वर्धा आश्रमाचे संचालन करू लागले. नागपूरच्या झेंडा सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे विनोबांना १७ जून १९२३ रोजी १२ महिन्यांसाठी कारावास झाला. वर्ध्याच्या आश्रमात ११ वर्ष, ८ महिने व १९ दिवस राहिल्यानंतर ते इ. स. १९३२ मध्ये वापासून २ मैल दूर असलेल्या हरिजनांच्या नलवाडीला गेले. तिथे ते स्वत: कातलेल्या सुतावर मिळणाऱ्या पैशाने पोट भरीत होते. इ. स. १९३८ मध्ये आजारी झाल्यामुळे, पवनार नदी तटावर असलेल्या पवनार गावातील टेकाडावर राह लागले. तीच कुटी आज ‘पवनार आश्रम' नावाने प्रसिद्ध आहे. 

 

           १७ ऑक्टोबर १९४० मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भातील व्यक्तिगत सत्याग्रहामुळे ३ महिन्यांचा कारावास झाला. नंतर ६ महिने व मग एक वर्षासाठी कैद झाली. इ. स. १९४२ च्या 'चले जाव' चळवळीमध्ये ९ ऑगस्ट १९४२ रोजी विनोबांना तीन वर्षांची कैद झाली. कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी स्वत:ला राजकारणापासून बाजूला करून पवनार आश्रमात ग्राम सेवेला वाहून घेतले. देशाच्या फाळणीनंतर लोकांमध्ये आर्थिक समानता आणण्यासाठी विनोबांनी 'कंचन मुक्ती' व 'भूदान चळवळ सुरू केली. तेलंगणामध्ये एका श्रीमंत शेतकऱ्याने सर्वप्रथम आपली १०० एकर जमीन दान केली. तिथे ते ५१ दिवस राहिले. त्या काळात १२२०० एकर जमीन विनोबांना दान रूपात भेट म्हणून मिळाली. ती सर्व जमीन त्यांनी भूमिहीनांना दान केली.

 

       याच भूदान यज्ञासाठी विनोबा २७ महिने बिहारमध्ये राहिले. तिथे लोकनायक जयप्रकाश नारायण यांची त्यांना खूप मदत झाली. या भूदान यज्ञात विनोबांना मार्च १९५६ पर्यंत ४० करोड एकर पेक्षा जास्त भूमी मिळाली. यासाठी चाळीस हजार मैलांची पदयात्रा त्यांनी केली. जवळजवळ २५० लाख भारतवासींची भेट त्यांनी घेतली. भारतभर विनोबांची भदान चळवळ खूपच फोफावली व प्रसिद्ध झाली. या पदयात्रेच्या काळात देशातल्या परंपरावादी लोकांचा त्रासही त्यांना सहन करावा लागला. बिहारच्या वैद्यनाथ-धाम इथे हा कटू अनुभव त्यांना आला. तिथे त्यांच्यावर लाठीहल्ला झाला. त्यात जखमी होऊन विनोबांना पण आले. ही दुर्घटना दि. १९ सप्टेंबर १९५३ ची. 

 

         दि २२ मे १९६० रोजी 'शस्त्रापासून मुक्ती' हा एक अनोखा समारंभ योजला. चंबळच्या खोऱ्यातील २२ डाकू सरदारांनी आत्मसमर्पण करून तस्य वत्तीचा त्याग केला. त्यांनी दरोडेखोरी सोडली. सगळ्या विश्वाला आश्चर्यचकित करणारी ही घटना होती. हा हिंसेवर अहिंसेने मिळविलेला विजय होता. विनोबांच्या आयुष्यातील ही जीत होती.

 

        विनोबाजींनी पदयात्रेच्या वेळी बोधगया ‘समन्वय आश्रम', पठाणकोट प्रस्थान आश्रम', इंदूर "विसर्जन आश्रम', बंगलोर 'विश्व नीडम आश्रम', आसाम “मैत्री आश्रम' अशा वेगवेगळ्या भागांत अनेक आश्रमांची स्थापना केली. मृत्यूपूर्वी काही वर्षे आधी विनोबांनी जैन धर्मग्रंथांचा अभ्यास करून, त्यांतील गर्भितार्थ 'समण सुत्तम' नावाच्या ग्रंथात एकत्र करून लिहिला. आपल्या कारावासाच्या जीवनात विनोबांनी दक्षिण भारतातील भाषा व देशातील सर्व भाषांच्या लिप्यांचा अभ्यास केला आणि त्या नागरी लिपीमध्ये लिहिण्याचा सल्ला दिला. आपल्या देशाच्या विकासासाठी सर्वोदय, भूदान, ग्रामदान, जीवनदान इ. नवीन प्रेरणादायक प्रवृत्तींचे आजीवन संचालन आचार्य विनोबाजी करत राहिले.

 

       सर्वोदयाची प्रथम यात्रा ३१५ मैलांची केली गेली. ७ एप्रिल १९५१ ला आंध्र प्रदेशात सर्वोदय संमेलन झाले. त्याचबरोबर भूदान चळवळीचाही उदय झाला तेलंगणमध्ये. पं. नेहरूंना ‘सर्वोदय' शब्द बदलून हवा होता; पण विनोबांना ते अमान्य होते. जानेवारी १९५९ ला राजस्थानात आल्यावर फेब्रुवारीच्या अखेरीस अजमेरला सर्वोदयचे अकरावे संमेलन विनोबांनी घेतले. त्या वेळी 'जय जगत्' ही नवी आरोळी विनोबांनी दिली. सर्वोदय आंदोलनातूच ग्रामदान व जीवनदान आंदोलन उभे राहिले.

 

        इ. स. १९५८ मध्ये या महान क्रांतिकारी अहिंसात्मक सामाजिक नेतृत्वासाठी आचार्य विनोबा भावेंना मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित केले. कैदेत असताना गीतेवरची विनोबांची प्रवचने हिंदी, इंग्रजी व अन्य वीस भारतीय भाषांमध्ये प्रकाशित झाली आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, गांधींच्या हत्येनंतर आचार्य विनोबांचा उदयसुधारक नेत्याच्या स्वरूपात झाला. देशातील मोठमोठे नेता, पंतप्रधान आध्यात्मिक, सामाजिक व राजनैतिक विचारविमर्ष करण्यासाठी विनोबांकडे त. पण आता विनोबा मात्र स्वत:ला अलिप्त मानायला लागले होते. म्हणून  त्यांना खाणे-पिणे सोडून महानिर्वाणाची तयारी केली. शेवटी दि. १५ नोव्हेंबर १९८२ ला या महान आधुनिक संताची प्राणज्योत अनंतात विलीन झाली.


       भारत सरकारला त्यांच्या मृत्यूचा राष्ट्रीय शोक मानायचा होता. पण विनोबाजींनी आपल्या आयुष्यात स्वत:ला कधीच नेता किंवा कोणी अद्वितीय व्यक्ती मानले नव्हते. म्हणून पवनार आश्रमातील लोकांनी विनोबांच्या अंतिम इच्छेनुसार कोणताही शोक मानायला परवानगी नाकारली. विनोबांना सरकारने 'भारतरत्न' पुरस्कार देऊ केला असता तर त्यांनी तो कधीच स्वीकारला नसता. म्हणून इ. स. १९८३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारत सरकारने आचार्य विनोबा भावे यांना मरणोत्तर 'भारतरत्न' हा सन्माननीय पुरस्कार बहाल केला.